By DAYANAND MOHITE | प्रकाशित: फेब्रुवारी 04, 2021 11:13 AM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
बॉलिवूडची अभिनेत्री उर्मिला मातोंडकरने (Urmila Matondkar) काही दिवसांपूर्वी राजकारणात प्रवेश केला आहे. बॉलिवूड कारर्किदीबरोबरच तिने राजकारणाची इनिंग देखील सुरू कली आहे. उर्मिला मातोंडकर आज 47 वा वाढदिवस साजरा करीत आहे. उर्मिलाचा जन्म 4 फेब्रुवारी 1974 रोजी मुंबई येथे झाला होता. उर्मिलाने बाल कलाकार म्हणून करिअरची सुरूवात केली. तिने प्रथम ‘मासूम’ चित्रपटात काम केले. त्या चित्रपटातील अभिनयानुळे उर्मिला स्टार झाली होती. रामगोपाल वर्माच्या रंगीला चित्रपटात ती दिसली होती आणि तेव्हापासून बॉलिवूडमध्ये उर्मिलाची एक वेगळी ओळख निर्माण झाली.
मात्र, याचदरम्यान उर्मिला राम गोपाल वर्माच्या प्रेमात पडली होती. रंगीलानंतर उर्मिला राम गोपाल वर्माच्या सत्या, भूत आणि कौनसारख्या चित्रपटात दिसली होती. या चित्रपटांच्या दरम्यान उर्मिला आणि राम गोपाल वर्मा एकमेकांच्या प्रेमात पडले होते. कालांतराने दोघांचेही प्रेम टिकू शकले नाही. पण त्यांच्या या नात्याबद्दल सर्वत्र बातम्या आल्या.
राम गोपाल वर्माशी असलेल्या नात्याचा परिणाम उर्मिलाच्या कारकिर्दीवर झाला. राम गोपाल वर्मा आणि उर्मिला मातोंडकर या दोघांनीही कधीच त्यांचा संबंध स्वीकारले नाही. जेव्हा दोघे वेगळे झाले तेव्हा उर्मिलाला चित्रपट मिळत मिळाले नाही. तिला चित्रपटांच्या आॅफर देखील येणे बंद झाले.
उर्मिलाने हिंदी व्यतिरिक्त तमिळ, तेलगू, मल्याळम आणि मराठी चित्रपटांमध्येही काम केले आहे. उर्मिलाला सर्वोत्कृष्ट अभिनयासाठी फिल्मफेअर पुरस्कार आणि नंदी पुरस्कारानेही गौरविण्यात आले आहे. फिल्मी जगापासून थोड दूर गेल्यानंतर उर्मिला मातोंडकरने 2016 मध्ये काश्मिरी मॉडेल आणि उद्योगपती मोहसीन अख्तर मीरशी लग्न केले. मोहसीन उर्मिलापेक्षा वयाने दहा वर्षांनी लहान आहे.
अभिनेता लक्ष्मीकांत बेर्डे (Laxmikant Berde) आणि प्रिया बेर्डे (Priya Berde) यांची मुलगी स्वा....
अधिक वाचा