ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

अदनानला 50 लाखाचा दंड

By Sudhir Shinde | प्रकाशित: सप्टेंबर 18, 2019 12:47 PM 2019-02-12T14:15:30+5:30

अदनानला 50 लाखाचा दंड

शहर : मुंबई

प्रसिद्ध गायक अदनान सामीने 2003 मध्ये पाकिस्तानचं नागरिकत्व असताना मुंबईत 8 फ्लॅट आणि 5 पार्किंग जागांची खरेदी केली होती. मात्र याची माहिती अदनानने रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला दिली नाही. परदेशी नागरिकांसाठी ही बाब गरजेची असते. त्यामुळे या प्रकरणी अदनानला 50 लाख रुपये दंड ठोठावण्यात आला आहे. यापैकी 10 लाख रुपये त्याने आधीच भरले आहेत. आता उर्वरित 40 लाख रुपये भरण्यासाठी सामीला 3 महिन्याची मुदत देण्यात आली आहे.

 भारतीय कायद्यानुसार जर परदेशी नागरिकाने भारतात संपती खरेदी केली किंवा कोणत्याही प्रकारची गुंतवणूक केली तर त्याची माहिती रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला देणे बंधनकारक आहे. मात्र अदनान सामीने याची माहिती दिली नाही हे समजताच फॉरेन एक्सचेंज मॅनेजमेंट अॅक्ट अंतर्गत  ईडीने त्याच्यावर 2010 मध्ये 20 लाख रूपयांचा दंड ठोठवून संपती जप्त केली. या विरोधात अदनानने अपीलेट ट्रिब्युनलमध्ये दाद मागितली होती.

या प्रकरणात कोणत्याही प्रकारे परकीय चलनाचा समावेश  नाही. त्यामुळे कोणतेही नुकसान झालेले नाही. संपूर्ण रक्कम भारतीय रुपयांमध्ये फेडण्यात आली इतकेच नाही तर संपती साठी कर्ज घेतलं. तसेच देशाबाहेर झालेली कमाई आणि त्यावर लागलेला करही सामीने भारतीय रुपयांमध्ये भरला. या गोष्टीचा आधार घेत ट्रिब्युनलने फेमा कायद्यांतर्गत जप्तीचा आदेश फेटाळला. मात्र इडीने लावलेल्या दंडाची रक्कम वाढवून 50 लाख रुपये केली आहे.

दरम्यान 2016 मध्ये अदनान सामीला भारतीय नागरिकत्व प्रदान करण्यात आले आहे. ट्रिब्युनलच्या निर्णयावर आनंद व्यक्त करताना अदनान सामी म्हणाला की, " माझ्या मेहनतीच्या कमाईने खरेदी केलेली संपती वाचली ही मोठी दिलासादायक गोष्ट आहे."

मागे

नूतनीकरण करण्यात आलेल्या जयकर बंगल्याचे एनएफएआय येथे उद्‌घाटन
नूतनीकरण करण्यात आलेल्या जयकर बंगल्याचे एनएफएआय येथे उद्‌घाटन

पुण्याच्या नव्याने बांधण्यात आलेल्या जयकर बंगला या वारसा स्थळाचे उद्‌घा....

अधिक वाचा

पुढे  

अभिनेता नागार्जुनच्या फार्महाऊसवर आढळला मृतदेह
अभिनेता नागार्जुनच्या फार्महाऊसवर आढळला मृतदेह

दाक्षिणात्य अभिनेता नागार्जुनच्या फार्म हाऊसवर एका व्यक्तीचा मृतदेह आढळल....

Read more