ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

तब्बल 25 वर्षांनंतर मराठी चित्रपटात काम करणार महानायक

By MACHHINDRANATH PAWAR | प्रकाशित: मे 09, 2019 07:29 PM 2019-02-12T14:15:30+5:30

तब्बल 25 वर्षांनंतर मराठी चित्रपटात काम करणार महानायक

शहर : मुंबई

तब्बल 25 वर्षांनंतर मराठी चित्रपटात बॉलिवूडचे महानायक अर्थात अमिताभ बच्चन काम करणार आहेत. बिग बी मिलिंद लेले दिग्दर्शित ‘ए बी आणि सी डी’ या मराठी चित्रपटात महत्त्वपूर्ण भूमिका साकारणार असल्याची माहिती समोर येत आहे. विक्रम गोखलेंसोबत या चित्रपटात त्यांची महत्वाची दृश्ये आहेत. हेमंत ऐदलाबादकर यांचे या चित्रपटाची कथा पटकथा आणि संवाद आहे.
मुंबईत या चित्रपटाच्या शूटिंगला येत्या 20 मेपासून सुरुवात होणार आहे. या चित्रपटाचे बरेचसे चित्रीकरण मुंबई आणि पुणे येथे होईल. या चित्रपटात दोन गाणीही आहेत. बिग बींनी यापूर्वी दीपक सावंत यांनी निर्मिलेल्या आणि श्रीधर जोशी दिग्दर्शित आक्का (1994) या मराठी चित्रपटात जया बच्चन यांच्यासोबत ‘तू जगती अधिपती’ या गणपती आरती गीतात भूमिका साकारल्यानंतर ते तब्बल पंचवीस वर्षांनी मराठी चित्रपटाच्या पडद्यावर दिसतील. तर बिग बींच्या ‘एबीसीएल’ या कंपनीच्या वतीने उमेश विनायक कुलकर्णी दिग्दर्शित विहीर ( 2009) या मराठी चित्रपटाची निर्मिती करण्यात आली होती.

मागे

सलमान खानच्या लग्नचे  गुपित त्याच्या वडिलांकडे
सलमान खानच्या लग्नचे  गुपित त्याच्या वडिलांकडे

53 वर्षीय अभिनेता सलमान  लग्न का करत नाही? असा प्रश्न त्याच्या चाहत्यांना स....

अधिक वाचा

पुढे  

प्रसिद्ध टिव्ही अभिनेत्याच्या मुलीचा दुर्दैवी मृत्यू
प्रसिद्ध टिव्ही अभिनेत्याच्या मुलीचा दुर्दैवी मृत्यू

टीव्ही अभिनेता प्रतीश वोरा यांच्या दोन वर्षांच्या मुलीचा दुर्दैवी मृत्यू ....

Read more