By MACHHINDRANATH PAWAR | प्रकाशित: मे 03, 2019 01:02 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
शाहरुख आणि गौरी यांची लव्हस्टोरी एखाद्या चित्रपटापेक्षा कमी नाही. दोघाचं भेटणं, प्रेम होणं आणि अनेक समस्यांचा सामना करत दोघांच लग्न होणं ही गोष्ट एखाद्या चित्रपटाप्रमाणेच आहे. शाहरुख आणि गौरी यांच्याविषयी गौरीच्या वडिलांना समजलं त्यावेळी त्यांनी गौरीला गुपचूप मुंबईत एका नातेवाईकांकडे पाठवलं. गौरीला शोधण्यासाठी शाहरुखही घरातून निघाला आणि त्याने रेल्वे स्टेशनवरच संपूर्ण रात्र काढली. गौरी आणि शाहरुखच लग्न झालं त्यावेळी शाहरुखची कमाई अतिशय कमी होती. हनिमूनला जाण्यासाठीही त्याच्याकडे पैसे नव्हते. पण तरीही शाहरुख गौरीला पॅरिसला जातोय सांगून हनिमूनसाठी दार्जिलिंगला घेऊन गेला होता. शाहरुख आणि गौरी यांच्या लग्नाला 27 वर्ष झाली आहेत. काही दिवसांपूर्वी एका अवॉर्ड शोदरम्यान शाहरुखने त्यांच्या हनिमूनबाबतचा मजेशीर किस्सा शेअर केला आहे. विकी कौशलने शोचं सुत्रसंचालन करत असताना दार्जिलिंगमधील शाहरुख आणि गौरीचा एक फोटो दाखवला आणि या फोटोमागची कहाणी विचारली. त्यावेळी शाहरुखने हा माझा सर्वात आवडता फोटो असल्याचं सांगितलं. ’जेव्हा माझं लग्न झालं त्यावेळी मी अतिशय गरिब होतो आणि गौरी मध्यमवर्गीय कुटुंबातून होती. लग्नानंतर सर्वांप्रमाणे मीदेखील गौरीला पॅरिसला घेऊन जाईन आणि आयफिल टॉवर दाखवेन असं सांगितंल. परंतु हे सगळं खोटं होतं, माझ्याकडे त्यावेळी इतके पैसेच नव्हते.’
शाहरुख 18 वर्षांचा असताना एका पार्टीमध्ये तो गौरीला भेटला. गौरी ही पहिली मुलगी होती जिच्यासोबत शाहरुखने डान्स केला होता. 18 वर्षांचा असताना शाहरुखला 14 वर्षाच्या गौरीसोबत प्रेम झालं होतं. 25 ऑक्टोबर 1991 मध्ये या दोघांनी लग्न केलं.
बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा आणि अर्जुन कपूरच्या अफेअरच्या चर्चांना उध....
अधिक वाचा