By VISHRANTI SHINDE | प्रकाशित: जानेवारी 04, 2020 03:24 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
मुंबई - अक्षय कुमार, करीना कपूर-खान, दिलजीत दोसांझ आणि कियारा आडवाणी यांच्या मुख्य भूमिका असलेल्या 'गुड न्यूज' चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई केली आहे. एका आठड्याभरात चित्रपटानं १०० कोटींच्या क्लबमध्ये एन्ट्री केली असून आठ दिवसांच्या कमाईचा आकडा हा १३० कोटींच्यावर पोहोचला आहे.
तरण आदर्श यांनी दिलेल्या माहितीनुसार 'गुड न्यूज'नं पहिल्या दिवशी २७ कोटी, दुसऱ्या दिवशी २१.७८ कोटी, तिसऱ्या दिवशी २५.६५ कोटींची कमाई चित्रपटानं केली आहे. दुसऱ्या आठवड्यातही चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली असून नववर्षांच्या पहिल्याच दिवशी चित्रपटानं २२.५० कोटींची कमाई केली होती.
बॉक्स ऑफिस इंडिया वेबसाइटनुसार 'गुड न्यूज' चित्रपटाने 'दबंग-३' चित्रपटालाही कमाईच्या पिछाडीवर टाकलं आहे. आंतरराष्ट्रीय बॉक्स ऑफिसवरील कमाईतही चित्रपटानं बाजी मारली असून पहिल्या आठवड्यात आंतरराष्ट्रीय बॉक्स ऑफिसवर चित्रपटानं एकूण ४५.८२ कोटींची कमाई केली आहे. हा चित्रपट अमेरिका, युके, ऑस्ट्रेलिया, युएईमध्येही प्रदर्शित झाला आहे.
काय आहे 'गुड न्यूज'?
मुंबईतील एका हाय-फाय सोसायटीत राहणारे वरुण बत्रा (अक्षयकुमार) आणि त्याची पत्नी दीप्ती बत्रा (करिना कपूर-खान) लग्नानंतर सात वर्षे उलटून गेल्यानंतरही आई-बाबा होऊ शकलेले नाहीत. कुटुंबाचा दबावही त्यांच्यावर आहेच. अनेक प्रयत्न करूनही यश येत नसल्याने दोघेही 'आयव्हीएफ' तंत्रज्ञानाच्या साह्याने अपत्याला जन्म देण्याचा निर्णय घेतात. दुसरीकडे चंडीगडमध्ये राहणारे हनी बत्रा (दिलजीत दोसांज) आणि मोनिका (कियारा अडवाणी) यांचीही हीच समस्या आहे.
'आयव्हीएफ'साठी वरुण -दीप्ती आणि हनी-मोनिका मुंबईतील नामांकित 'आयव्हीएफ' तज्ज्ञ डॉक्टर जोशी (आदिल हुसैन) यांच्याकडे जातात. मात्र, आडनावातील साधर्म्यामुळे वरुण आणि हनी यांचे 'स्पर्म एक्सेंज' होतात आणि एकच गोंधळ उडतो. दोन्ही बत्रा दाम्पत्य मूळापासून हादरून जातात. उच्चभ्रू वर्तुळात राहणारे बत्रा दाम्पत्य आणि दुसरीकडे चंडीगडमध्ये काहीसे निवांत आणि 'रफ अँड टफ' जगणरे दुसरे बात्रा दाम्पत्य यामध्ये हल्लकल्लोळ उडतो.
मुंबई - अभिनेत्री रिंकू राजगुरूच्या 'मेकअप' चित्रपटाची सध्या ब....
अधिक वाचा