By DAYANAND MOHITE | प्रकाशित: ऑक्टोबर 23, 2020 11:03 AM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारचा आगामी चित्रपट ‘लक्ष्मी बॉम्ब’ (Akshay Kumar Laxmmi Bomb) ट्रेलर प्रदर्शित झाल्या दिवसापासून वादात अडकला आहे. आता अक्षयसमोरील अडचणीत आणखी वाढ झाली आहे. ‘लक्ष्मी बॉम्ब’ या चित्रपटाचे नाव बदलावे अशी मागणी सध्या जोर धरू लागली आहे. या नावामुळे धार्मिक भावना दुखावल्या जात असल्याचे म्हणत, आता राष्ट्रीय हिंदू सेनेने या चित्रपटाविरोधात आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.
राष्ट्रीय हिंदू सेनेने केंद्रीय प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांना पत्र लिहून ‘लक्ष्मी बॉम्ब’ बंदी घालण्याची मागणी केली आहे. चित्रपटाचे नाव बदलले नाही, तर प्रदर्शनाच्या वेळी त्यांचे कार्यकर्ते प्रत्येक चित्रपटगृहाबाहेर निषेधात्मक आंदोलन करतील, असा इशाराही या पत्रातून देण्यात आला आहे. हिंदू सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष विष्णू गुप्ता यांनी ट्विट करत याबाबत माहिती दिली आहे. ‘हिंदू सेनेने प्रकाश जावडेकर यांना पत्र लिहीत, ‘लक्ष्मी बॉम्ब’ बनवणाऱ्या निर्मात्यांविरूद्ध कारवाई करण्यात यावी, अशी मागणी केली आहे. कारण या चित्रपटाच्या नावातून देवी लक्ष्मी आणि हिंदूंचा अपमान केला आहे’, असे या ट्विटमध्ये लिहिले आहे.
‘हे’ आहे वादाचे नेमके कारण
एका विशिष्ठ समुदायाला भडकवण्यासाठी निर्मात्यांनी या चित्रपटाचे नाव ‘लक्ष्मी बॉम्ब’ असे ठेवण्यात आल्याचा आरोप या पत्रातून करण्यात आला आहे. त्यांच्या मते, लक्ष्मी या नावासमोर बॉम्ब हा शब्द वापरणे अमान्य आहे. आपण ज्या लक्ष्मीची पूजा करतो, तिचा सन्मान करतो, तिच्या नावापुढे बॉम्ब असा शब्द लिहिणे अतिशय निंदनीय आहे. अक्षयचा ‘लक्ष्मी बॉम्ब’ लव्ह जिहादला प्रोत्साहन देत असल्याचे देखील हिंदू सेनेने म्हटले आहे. या चित्रपटात एक हिंदू मुलगी आणि मुस्लिम तरुणाची प्रेमकहाणी दाखवण्यात आली आहे. याच मुद्द्याला धरून, हिंदू सेनेने प्रदर्शनापूर्वीच या चित्रपटाचे नाव नाव बदलण्याची मागणी केली आहे.
Hindu Sena has given a complaint letter @PrakashJavdekar to take appropriate action against the promoters, cast and crew of the upcoming movie "Laxmmi Bomb" starring @akshaykumar and directed by Sh Raghava Lawrence for making mockery of Hindu Goddess Laxmi's name, @ANI pic.twitter.com/5UjVfXBNJB
— Vishnu Guptaमागे
Kangana Ranaut : मुंबई पोलिसांचं ठरलं, कंगनाला चौकशीला बोलावणार
बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौतला (Kangana Ranaut) मुंबई पोलीस चौकशी बोलावणार आहेत (Mumbai Poli....
अधिक वाचा