By MACHHINDRANATH PAWAR | प्रकाशित: मे 03, 2019 06:04 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
लोकसभा निवडणुकीतील चौथ्या टप्यात मुंबई आणि उपनगरात 29 एप्रिल रोजी मतदान झाले. यावेळी बॉलिवूडच्या अनेक सेलिब्रेटींनी मतदानाचा हक्क बजावला. त्यानंतर, पंतप्रधान नरेंद्र मोदींची मुलाखत घेणार्या सिनेअभिनेता अक्षय कुमारने मतदान केले का? अशा पोस्ट सोशल मिडियावर व्हायरल झाल्या. तर, काही पत्रकारांनी अक्षय कुमारला याबाबत प्रश्नही विचारला होता. त्यावर अक्षयने उत्तर देण्याचं टाळलं. मात्र, आता अक्षयने कॅनडाच्या नागरिकत्वाबाबत मौन सोडलं आहे.
अक्षय कुमारने काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदींची अराजकीय मुलाखत घेतली होती. अक्षयने घेतलेली मुलाखत अराजकीय असली तरीही त्यावर राजकीय प्रतिक्रिया पहायला मिळाल्या. सोशल मिडियावर अक्षयने घेतेलेल्या मुलाखतीच्या पोस्ट फिरत असल्याचे पहायला मिळाले होते. त्यानंतर, सोमवारी झालेल्या चौथ्या टप्प्यातील मतदानावेळी अक्षय कुमार कुठेही मतदान करताना दिसला नाही.अक्षय कुमार कॅनडाचा नागरिक असल्यामुळे त्याला मतदान करता येणार नाही असा दावा सोशल मिडियावर होतांना दिसत आहे. मोदींची मुलाखत घेणारे अक्षय मतदान केले का? असे प्रश्न सोशल मिडीयावर विचारले जात आहे.
अक्षय कुमारने सोशल मीडियावरील या प्रश्नांना सोशल मीडियाद्वारेच उत्तर दिले आहे. आपल्या ट्विटर हँडलवरुन अक्षयने ट्विट करुन याबाबत खुलासा केला. ”माझ्या नागरिकत्वाबाबत एवढी रुची का दाखवली जात आहे. त्यावरुन विनाकारण नकारात्म संदेश का फिरवले जात आहेत. मी माझ्या कॅनडाच्या नागरिकत्वाबाबत कधीही लपवा-छपवी केली नाही. माझ्याजवळ कॅनडाचा पासपोर्टही आहे. तसेच, हेही सत्य आहे की, मी गेल्या 7 वर्षात एकदाही कॅनडाला गेलो नाही. मी भारतात काम करतो आणि भारतातच टॅक्स भरतो,” असे ट्विट अक्षयने केले आहे. तसेच माझे भारत देशावर किती प्रेम आहे, हे सिद्ध करुन दाखवायची गरज मला वाटत नाही. मी देशाला अधिक मजबूत बनविण्यासाठी माझं छोटसं योगदान देत असल्याचं अक्षयने म्हटले आहे. दरम्यान, अक्षयच्या या ट्विटनंतर नेटीझन्सच्या संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत. तर अनेकजण अक्षयच्या देशप्रेमाबद्दल त्याचं कौतुकही करत आहे.
रजनीकांत यांचे दरबार या चित्रपटचे शूटींग सध्या मुंबईमध्ये सुरू आहे. परंतु, ....
अधिक वाचा