ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

'आयर्न मॅन' 'पॅडमॅन' सेम सेम...

By PRIYANKA BAGAL | प्रकाशित: एप्रिल 28, 2019 04:37 PM 2019-02-12T14:15:30+5:30

'आयर्न मॅन' 'पॅडमॅन' सेम सेम...

शहर : मुंबई

अ‍ॅव्हेंजर्स- एंडगेमने जगभरातील प्रेक्षकांना वेड लावले आहे. बॉलिवूडचे सेलिब्रिटीही याला अपवाद नाही. अशात बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार याने काय करावे? तर त्याने चक्क अ‍ॅव्हेंजर्स- एंडगेममध्ये आयर्न मॅनची भूमिका साकारणारा हॉलिवूड अभिनेता रॉबर्ट डाऊनीची कॉपी पकडलीय. होय, अक्षयने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक फोटो शेअर केलाय. या व्हिडिओत रॉबर्ट डाऊनीने चक्क अक्षयसारखी टाय घातली आहे. एवेंजर्स एंडगेममध्ये आयर्न मॅनची व्यक्तिरेखा साकारणारा हॉलिवूड अभिनेता रॉबर्ट डाउनीनेही त्याच्यासारखीच टाय घातली आहे.  असे अक्षयने हा फोटो शेअर करताना लिहिले आहे.

सर्वप्रथम रॉबर्ट डाउनीने आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवरुन आपला सूटाबुटातला फोटो शेअर केला. यात तो सूट आणि टाय घालून उभा असलेला दिसत आहे. अक्षयने हा फोटो पाहिला तेव्हा आपल्याकडेही अगदी तशीच टाय असल्याचे त्याला कळले.  मग काय त्यानेही रॉबर्ट डाउनीनेही त्याच्यासारखीच टाय घातली, हे दाखवण्याचा मोह त्याला आवरता आला नाही.  जेव्हा आयर्न मॅनही तुमच्यासारखी टाय घालतात. कोणावर ही टाय चांगली दिसते? असे अक्षयने लिहिले. अक्षयच्या या पोस्टवर नेटीजन्सनी एकामागोमाग एक कमेन्ट द्यायला सुरुवात केलीय. तर,पॅडमॅन आणि आयर्न मॅन एकत्र.. अशी कमेंट एका युजरने दिलीय.  

मागे

संजय नार्वेकरने नाकारली होती ‘सर्कीट’ची भूमिका...
संजय नार्वेकरने नाकारली होती ‘सर्कीट’ची भूमिका...

झी मराठी वाहिनीवरील संजय मोने यांच्या कानाला खडा या चॅट शोची सर्वत्र चर्चा ....

अधिक वाचा

पुढे  

राञीस खेळ चाले मधल्या अण्णांनी भूमिकेसाठी घेतली अशी मेहनत
राञीस खेळ चाले मधल्या अण्णांनी भूमिकेसाठी घेतली अशी मेहनत

रात्रीस खेळ चालेच्या पहिल्या सिझनमध्ये अण्णांची भूमिका फार छोटी होती. निर्....

Read more