ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

परदेशी नागरिकही राष्ट्रीय पुरस्कारास पात्र - दिग्दर्शक राहुल ढोलकिया

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: मे 05, 2019 01:55 PM 2019-02-12T14:15:30+5:30

परदेशी नागरिकही राष्ट्रीय पुरस्कारास पात्र - दिग्दर्शक राहुल ढोलकिया

शहर : मुंबई

लोकसभा निवडणुकांचे वारे साऱ्या देशात वाहत असतानाच आता काही बॉलिवूड कलाकारांच्या नागरिकत्वाच्या मुद्द्यालाही चालना मिळाली आहे. जे नागरिक भारताचे नागरिक नाहीत अशा कलाकारांवर काही स्तरांतून निशाणाही साधण्य़ात आला. यामध्ये अभिनेता अक्षय कुमारच्या नावाचाही समावेश आहे. राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार जिंकणाऱ्या खिलाडी कुमारच्या कॅनडियन नागरिकत्वाच्या मुद्द्यावरही कलाविश्वातूनच प्रश्न उपस्थित करण्यात आला. ज्यानंतर दिग्दर्शक राहुल ढोलकिया यांनी खिलाडी कुमारची बाजू घेत या प्रश्नाचं उत्तर दिल्याचं पाहायला मिळालं.

शनिवारी राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांविषयीच्या चर्चांना उधाण आलेलं असतानाच चित्रपट संकलक आणि लेखक अपूर्व असरानी यांनी अक्षयला मिळालेल्या राष्ट्रीय पुरस्काराविषयी महत्त्वाचा प्रश्न उपस्थित करत एक प्रकारे त्य़ावर आक्षेपच घेतला.

'कॅनेडियन नागरिक भारतातील राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांसाठी पात्र असतात का?', असा प्रश्न उपस्थित करत त्यांनी २०१६ मधील राष्ट्रीय पुरस्कारांचा संदर्भ दिला. ज्यावेळी अक्षयला 'रुस्तम' या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. त्यावेळी 'अलिगढ' या चित्रपटासाठी अभिनेता मनोज बाजपेयी यांना पुरस्कार मिळणं अपेक्षित असल्याचा मुद्दा मांडला होता.

असरानी यांच्या या ट्विटच्या उत्तरार्थ राहुल ढोलकिया यांनी सोशल मीडियाच्याच माध्यमातून महत्त्वाची माहिती दिली. परदेशी नागरिकही भारताच्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारास पात्र असतात याविषयीची नियमावली पोस्ट केली. ढोलकिया हे राष्ट्रीय पुरस्कारांच्या ज्युरींच्या समितीचे सदस्यही होते. त्यामुळे त्यांनी पुढाकार घेत काही महत्त्वाच्या गोष्टी स्पष्ट केल्या.

                                                                             

मागे

मुमताज लंडनमध्ये सुखरुप, सोशल मीडियावरील निधानाच्या अफवा
मुमताज लंडनमध्ये सुखरुप, सोशल मीडियावरील निधानाच्या अफवा

ज्येष्ठ अभिनेत्री मुमताज यांचे मुंबईतल्या एक रुग्णालयात निधन झाल्याचे अफ....

अधिक वाचा

पुढे  

खिलाडीने केली फानी चक्रीवादळातील पीडितांसाठी केली 1 कोटींची मदत
खिलाडीने केली फानी चक्रीवादळातील पीडितांसाठी केली 1 कोटींची मदत

बॉलिवूडचे खिलाडी अक्षय कुमार पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. फानी चक्रीवादळामु....

Read more