By DAYANAND MOHITE | प्रकाशित: फेब्रुवारी 10, 2021 10:27 AM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट (Alia Bhatt) आपल्या मित्रपरिवारासोबत मालदीवमध्ये व्हॅकेशन करता गेली होती. तिने सोशल मीडियावर शेअर केलेले फोटो इंटरनेटवर खूप व्हायरल होत होते. याच दरम्यान आलियाचा बॉयफ्रेंड रणबीर कपूर (Ranbir Kapoor) चे काका राजीव कपूर (Rajiv Kapoor) यांचं निधन झालं आहे. आलिया अशावेळी स्वतःला रोखू शकली नाही. तिने तात्काळ मुंबई गाठली आहे.
कपूर कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. अशावेळी रणबीर कपूरला आधार देण्यासाठी आलिया मालदीव ट्रिप सोडून मुंबईत परतली आहे. आलिया फक्त रणबीर कपूरच्याच नाही तर संपूर्ण कपूर कुटुंबियांच्या अगदी जवळ आहे. ती प्रत्येकवेळी कपूर कुटुंबियांसोबत दिसली आहे. तिने प्रत्येक वेळी कपूर कुटुंबाला सपोर्ट दिला आहे. मालदिववरून परतलेली आलिया पहिल्यांदा मुंबईतील एअरपोर्टवर स्पॉट झाली.
आलिया भट्ट सर्वात पहिली आपल्या घरी गेली. तिथे तिने कपडे बदलले आणि ती तात्काळ राजीव कपूर यांच्या घरी गेली. अगदी कमी वेळात आलियाने कपूर कुटुंबाला साथ दिली. यावरून हे स्पष्ट होतं की आलिया रणबीर आणि त्याच्या कुटुंबियांच्या अगदी जवळ आहे. ती त्यांची खूप काळजी घेते.
गेल्या वर्षी ऋषी कपूर यांचं निधन झालं. त्यावेळी देखील आलिया रणबीर आणि कपूर कुटुंबियांसोबत होती. त्यावेळी देखील आलिया रणबीरसोबत अतिशय खंबीरपणे उभी राहिली. आलिया कायमच रणबीरचा आधार बनली आहे आणि हे तिने वेळोवेळी दाखवून दिलं आहे.
‘राम तेरी गंगा मैली’सारख्या चित्रपटांतून प्रसिद्ध झालेले अभिनेते राजी....
अधिक वाचा