By DAYANAND MOHITE | प्रकाशित: नोव्हेंबर 30, 2020 10:28 AM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
बॉलिवूडमध्ये कधीकाय होईल सांगता येत नाही. अभिनेता अक्षय कुमारच्या आगामी 'बेल बॉटम' चित्रपटाच्या कास्टिंग दिग्दर्शकावर आणि त्याच्या मित्रावर बलात्काराचे आरोप लावण्यात आले आहेत. आयुष तिवारी असं त्या कास्टिंग दिग्दर्शकाचं नाव असून त्याच्या मित्राचं नाव राकेश शर्मा असं आहे. मुंबईतील वर्सोवा पोलीस स्थानकामध्ये त्यांच्याविरोधात आरोप दाखल करण्यात आले आहेत. आयपीसी कलम. ३७६ अन्वये दोघांवर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पीडित महिला एक अभिनेत्री आहे तिने अनेक चित्रपटांमध्ये आणि वेब सीरिजमध्ये काम केलं आहे. आयुषने लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार केल्याचे आरोप पीडित महिलेने केले आहे शिवाय ती जेव्हा आयुषचा मित्र राकेशकडे तक्रार करण्यासाठी गेली तेव्हा त्याने देखील पीडित महिलेवर बलात्कार केला.
दरम्यान, 'बेल बॉटम' चित्रपटाची शुटिंग पूर्ण झाली आहे. चित्रपटामध्ये अभिनेता अक्षय कुमार आणि अभिनेत्री वाणी कपूर मुख्य भूमिकेत दिसणार आहे.
बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणौत kangana ranaut हिच्या मुंबईतील घरावर आणि कार्यालयावर....
अधिक वाचा