By Sudhir Shinde | प्रकाशित: सप्टेंबर 25, 2019 11:32 AM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
अमिताभ बच्चन यांची 2018 दादासाहेब फाळके पुरस्कारासाठी निवड झाली आहे. केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी मंगळवारी ही माहिती दिली. विशेष म्हणजे 2019 साली अमिताभ बच्चन यांचा पहिला चित्रपट ‘सात हिंदुस्थानी’ रिलीज होण्यास 50 वर्षे झाली आहेत. 11 ऑक्टोबर 1942 रोजी तत्कालीन अलाहाबाद (सध्याच्या प्रयागराज) येथे जन्मलेल्या अमिताभ यांचा पहिला चित्रपट 'सात हिंदुस्तानी' 1969 मध्ये प्रदर्शित झाला होता. ख्वाजा अहमद अब्बास लिखित, निर्मित आणि दिग्दर्शित हा चित्रपट गोव्याला पोर्तुगीज राजवटीपासून मुक्त करणार्या सात हिंदुस्थानींच्या कथेवर आधारित होता. यात उत्पल दत्त, मधु, ए.के. हंगल आणि अमिताभ बच्चन मुख्य भूमिकेत होते.
The legend Amitabh Bachchan who entertained and inspired for 2 generations has been selected unanimously for #DadaSahabPhalke award. The entire country and international community is happy. My heartiest Congratulations to him.@narendramodi @SrBachchan pic.twitter.com/obzObHsbLk
— Prakash Javadekar (@PrakashJavdekar) September 24, 2019
दादासाहेब फाळके पुरस्कार
दादासाहेब फाळके पुरस्कार हा चित्रपटसृष्टीतील भारतीय आजीवन योगदानाबद्दल देण्यात येणारा वार्षिक पुरस्कार आहे. याची सुरुवात 1969 मध्ये दादासाहेब फाळके यांचा जन्म. अभिनेत्री देविका राणी यांना प्रथमच हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. पुरस्काराचे स्वरूप 10 लाख रुपये आणि स्वर्ण कमल असे आहे.
पुण्यातल्या भारतीय राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय येथे सुरु असलेल्या 14 व्या ....
अधिक वाचा