ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

'अनन्या' चित्रपट नव्या वर्षात प्रेक्षकांच्या भेटीला

By VISHRANTI SHINDE | प्रकाशित: जानेवारी 02, 2020 07:33 PM 2019-02-12T14:15:30+5:30

'अनन्या' चित्रपट नव्या वर्षात प्रेक्षकांच्या भेटीला

शहर : मुंबई

          मुंबई- 'शक्य आहे, तुम्ही जे ठरवाल ते शक्य आहे' अशी प्रेरणादायी टॅगलाइन घेऊन 'अनन्या' आता रुपेरी पडद्यावर येत आहे. प्रताप फड लिखित आणि दिग्दर्शित 'अनन्या' हा चित्रपट नव्या वर्षात प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या चित्रपटाचं टीजर पोस्टर नुकतंच सोशल मीडियावर प्रदर्शित करण्यात आलं.


           ड्रीमविव्हर एण्टरटेनमेन्ट आणि प्रसिद्ध लेखक- दिग्दर्शक रवी जाधव यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. तर स्वरूप स्टुडिओजचे आकाश पेंढारकर, सचिन नारकर आणि विकास पवार हे या चित्रपटाचे प्रस्तुतकर्ते आहेत. मराठी रंगभूमीवर प्रेक्षकांची भरभरून दाद मिळवल्यानंतर अनन्या ही प्रेरणादायी कथा आता रुपेरी पडद्यावर येण्यासाठी सज्ज आहे. त्यामुळे या चित्रपटाकडे लक्ष लागले आहे.


          चित्रपटाचं टीजर पोस्टर अतिशय लक्षवेधी आणि सूचक आहे. मोकळ्या आणि अथांग आकाशाकडे पाहात पक्षाप्रमाणे झेप घेऊ पाहाणारी तरुणी या पोस्टरवर दिसत आहे. त्यामुळे स्त्री केंद्रित, प्रेरणादायी आणि आशय संपन्न कथानक या चित्रपटातून मांडलं जाणार असल्यानं हा चित्रपट नक्कीच महत्त्वाचा ठरेल यात शंका नाही.
 

मागे

...म्हणून रणवीरसोबत वाढदिवस साजरा करण्यास दीपिकाचा नकार
...म्हणून रणवीरसोबत वाढदिवस साजरा करण्यास दीपिकाचा नकार

       मुंबई - अभिनेत्री दीपिका पादूकोन सध्या तिच्या आगामी 'छपाक' चित्....

अधिक वाचा

पुढे  

‘तुझे मेरी कसम’ जोडीचा मराठमोळा लूक पहिला का? 
‘तुझे मेरी कसम’ जोडीचा मराठमोळा लूक पहिला का? 

        मराठमोळा अभिनेता रितेश देशमुख आणि अभिनेत्री जेनेलिया यांची लव्....

Read more