By VISHRANTI SHINDE | प्रकाशित: डिसेंबर 12, 2019 07:26 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
मुंबई - बहुचर्चित 'मर्दानी २' सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. या सिनेमातून निडर आणि वचनबध्द पोलिस अधिकारी, शिवानी रॉयच्या भूमिकेत राणी मुखर्जी दिसुन येणार आहे. सध्या राणी सिनेमाच्या प्रमोशनमध्ये व्यस्थ आहे. या सिनेमाच्या माध्यमातून राणी मुलींविरुध्द तसेच किशोरवयीन मुलांच्या गुन्ह्यांत होणाऱ्या वाढीवर भाष्य करताना दिसेल. नुकतीच राणीने मुंबईच्या पोलीस कंट्रोल रुमला भेट दिली. यावेळी तिने देशाची सद्यस्थिती आणि सायबर क्राइमवर मोकळेपणाने चर्चा केली.
याबद्दल बोलताना राणी म्हणाली की, 'आपल्याला सुरक्षित ठेवण्यासाठी दररोज पोलिसांमार्फत केलं जाणारं अमाप काम पाहून मी अक्षरश: थक्क झाले. पोलीस अधिकारी अतिशय पद्धतशीरपणे, स्वत:ची पर्वा न करता त्यांचं कर्तव्य बजावत असतात. आपल्या सुरक्षेसाठी ते किती कष्ट घेतात हे वास्तव डोळे उघडणारे आहे.' 'पीसीआरला दिलेली भेट माझ्यासाठी अतिशय माहितीपर आणि शैक्षणिक स्वरुपाची ठरली असून गुन्हेगारीवर वचक ठेवण्यासाठी अतिशय उत्तम दर्जाचे काम केले जात आहे. नागरिकांना सुरक्षित ठेवण्यासाठीच्या पोलिसांच्या महत्वाकांक्षेचे आणि समर्पणाचे मी अगदी मनापासून आभार मानते.'
मर्दानी 2 च्या योगाने तरुण मुलींवर असलेल्या या जोखमीवरच्या चर्चेला नक्कीच वाचा फुटलेली आहे. आदित्य चोपडांची निर्मिती असलेला 'मर्दानी २' सिनेमा १३ डिसेंबरला देशभरात प्रदर्शित होणार आहे.
‘तान्हाजी : द अनसंग वॉरिअर’ या बहुचर्चित ठरलेल्या चित्....
अधिक वाचा