By VISHRANTI SHINDE | प्रकाशित: डिसेंबर 18, 2019 03:41 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : देश
“देशात अशांतता, भितीचं वातावरण निर्माण केलं जात असून द्वेषाची आग भडकवली जात आहे. ही परिस्थिती चिंता वाढवणारी आहे. ज्या लोकशाहीसाठी आम्ही इतक्या यातना झेलल्या त्याच्यावर अशाप्रकारे हल्ला होणं निंदनीय आहे. अशा परिस्थितीत कोणताही सरकारी पुरस्कार मी ठेवू इच्छित नाही,” असं उर्दू लेखक मुजतबा हुसैन यांनी सांगितलं आहे. ते आता आपला पद्मश्री पुरस्कार परत करणार आहेत.
याआधी देशात असहिष्णुता निर्माण झाल्याचं सांगत साहित्यिकांसह अनेकांनी पुरस्कार परत केले होते. मुजतबा हुसैन यांनी एएनआयशी बोलताना पुरस्कार परत करत असल्याचं सांगितलं आहे. मुजतबा हुसैन यांनी सांगितलं आहे की, “आपली लोकशाही चिरडली जात आहे. कोणतीही प्रथा राबवली जात नाही आहे. पहाटे सात वाजता शपथविधी पार पडत आहे. रात्रीच्या अंधारात सरकार स्थापन केलं जात आहे. देशात भीतीचं वातावरण आहे”. सुधारित नागरिकत्व कायदा हा लोकशाहीवर हल्ला असल्याचं मत त्यांनी व्यक्त केलं आहे.
सुधारित नागरिकत्व कायदा आणि राष्ट्रीय नागरिक नोंदणीवर बोलताना मुजतबा हुसैन यांनी सांगितलं आहे की, “मी ८७ वर्षांचा आहे. या देशाच्या भविष्याची मला चिंता आहे. या देशाच्या आरोग्याची मला चिंता आहे, जे मी माझ्या मुलांसाठी आणि पुढील पिढीसाठी सोडत आहे”. मुजतबा हुसैन यांना २००७ मध्ये पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं.
बॉलिवूड अभिनेता वरुण धवन आणि श्रद्धा कपूर यांची मुख्य भूमिका ....
अधिक वाचा