ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

मलंग सिनेमाच्या रोमँटिक ट्रेलरमध्ये एक वेगळाच थ्रील

By VISHRANTI SHINDE | प्रकाशित: जानेवारी 06, 2020 04:59 PM 2019-02-12T14:15:30+5:30

मलंग सिनेमाच्या रोमँटिक ट्रेलरमध्ये एक वेगळाच थ्रील

शहर : मुंबई

        मुंबई - दिशा पाटनी आणि आदित्य रॉय कपूर यांची सिझलिंग केमिस्ट्री असणारा मलंग हा चित्रपट सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय आहे. काही दिवसांपूर्वी या चित्रपटाचे नवीन पोस्टर प्रसिद्ध झाले होते. या पोस्टरमध्ये दिशा पाटनी आणि आदित्य रॉय कपूरला लिपलॉक किस करताना दिसली होती. त्यानंतर आता या सिनेमाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.

 

         मलंग सिनेमासाठी दिशा आणि आदित्य यांनी खुप मेहनत घेतली आहे. या चित्रपटासाठी दोघांनी अंडर वॉटर किसिंग सीनचे ट्रेनिंगही घेतले होते. एवढेच नाही तर या चित्रपटाच्या एका दृश्यासाठी दिशा आणि आदित्य यांना एक मिनिटला पाण्याखाली रहावे लागले होते. या ट्रेलरमध्ये एक वेगळाच थ्रील पाहायला मिळतो. दिशा-आदित्यची सिझलिंग केमिस्ट्री आणि त्यातील मर्डर मिस्ट्री हे कॉम्बिनेशन असेला हा ट्रेलर प्रेक्षकांना शेवटपर्यंत खिळवून ठेवतो. या सिनेमात अभिनेता अनिल कपूर पोलिसांच्या भूमिकेत दिसणार आहे.

 

       मोहित सूरी यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. या चित्रपटाची निर्मिती लव रंजन आणि अंकुर गर्ग यांनी एकत्र केली आहे. या चित्रपटात आदित्य, दिशा पाटनी व्यतिरिक्त अनिल कपूर आणि कुणाल खेमू यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. हा एक रोमँटिक थ्रिलर चित्रपट आहे. हा सिनेमा येत्या 7 फेब्रुवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

 

मागे

संगीत विश्वातल्या लखलखत्या ताऱ्याचा आज वाढदिवस
संगीत विश्वातल्या लखलखत्या ताऱ्याचा आज वाढदिवस

        मुंबई - एका चित्रपटासाठी दोन ऑस्कर मिळवलेला आणि सतत जीवन प्रवास....

अधिक वाचा

पुढे  

'शिकारा - द अनटोल्ड स्टोरीऑफ काश्मिरी पंडित' ट्रेलर प्रदर्शित
'शिकारा - द अनटोल्ड स्टोरीऑफ काश्मिरी पंडित' ट्रेलर प्रदर्शित

         १९९० च्या दशकात कश्मीरी पंडितांवर झालेल्या अत्याचारानंतर लाख....

Read more