ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

अनुराग कश्यपचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर थेट हल्लाबोल

By VISHRANTI SHINDE | प्रकाशित: डिसेंबर 21, 2019 02:07 PM 2019-02-12T14:15:30+5:30

अनुराग कश्यपचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर थेट हल्लाबोल

शहर : मुंबई

               मुंबई - नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधात देशभरात आंदोलनाचं सत्र सुरु आहे. कुठे दगडफेक तर कुठे जाळपोळ होत आहे. तर त्याविरोधात अनेक ठिकाणी शांततेतही मोर्चे निघत आहेत. अशा परिस्थितीत बॉलिवूडमधील चर्चित सिनेनिर्माता अनुराग कश्यपने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर थेट हल्लाबोल केला. अनुराग कश्यपने पंतप्रधान मोदींनी मुका आणि बहिरा असं संबोधलं आहे. 


          अनुराग कश्यपने ट्विट करुन मोदींवर तिखट टीका केली. अनुराग कश्यप काय म्हणाला? “आमचा प्रधानसेवक, आमचा पंतप्रधान, जनतेचा प्रधान नोकर नरेंद्र मोदी बहिरे, मुके आणि भावनाशून्य आहेत. ते केवळ एक नाटकी आहेत जे भाषण देऊ शकतात. अन्य काही त्यांच्या आवाक्याबाहेरचं आहे. त्यांना ना दिसतंय, ना ऐकू येतंय. ते आता नव नवा खोटापणा शिकण्यात व्यस्त आहेत” असं ट्विट अनुराग कश्यपने केलं आहे.


            यापूर्वीही त्यांनी आरोप केला होता की सरकार समर्थक दंगे सुरु करतात आणि त्यानंतर जनतेवर पोलीस तुटून पडतात. देशातील सद्यस्थितीला भाजप सरकार जबाबदार असून, चिघळलेल्या परिस्थितीमागे भाजपचाच हात आहे, असाही आरोप अनुराग कश्यप यांनी केला.    
 

मागे

'फोर्ब्स'ची सर्वाधिक कमाई करणाऱ्या कलाकारांची टॉप 100 यादी जाहीर, अव्वल कोण?
'फोर्ब्स'ची सर्वाधिक कमाई करणाऱ्या कलाकारांची टॉप 100 यादी जाहीर, अव्वल कोण?

फोर्ब्स इंडियाने सर्वाधिक कमाई आणि प्रिसिद्धी मिळवणाऱ्या टॉप सेलिब्रिटीं....

अधिक वाचा

पुढे  

'दबंग ३'ची पहिल्या दिवशी २४ कोटींची कमाई
'दबंग ३'ची पहिल्या दिवशी २४ कोटींची कमाई

           मुंबई - सलमान खानचा बहुप्रतीक्षीत 'दबंग ३' चित्रपट बॉक्स ऑ�....

Read more