By DAYANAND MOHITE | प्रकाशित: नोव्हेंबर 04, 2020 10:06 AM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
‘कलर्स’ वाहिनीच्या ‘बिग बॉस’ (Bigg Boss 14) या रिअॅलिटी शोमध्ये प्रसिद्ध गायक कुमार सानू (Kumar Sanu) यांचा मुलगा जान कुमार सानू (Jan Kumar Sanu) या स्पर्धकाने मराठी भाषेची चीड येत असल्याचं वक्तव्य केलं होतं. या वक्तव्यावरुन मनसे आणि शिवसेनेने आक्रमक भूमिका घेतल्यानंतर सुरुवातीला VICOM 18 नंतर जान कुमार सानू याने माफी मागितली, पाठोपाठ जानचे वडिल गायक कुमार सानू यांनीदेखील माफी मागितली आहे. परंतु जान कुमारची माफी बिग बॉस 11 ची एक्स कंटेस्टन्ट अर्शी खान (Arshi Khan) हिला पटलेली नाही. अर्शी खानला वाटतं की, जान कुमारने मराठी भाषेतच माफी मागायला हवी.
अर्शी खान सध्या एका मराठी गाण्याच्या शुटिंगमध्ये व्यस्त आहे. त्यासाठी ती सध्या मराठी भाषा शिकत आहे. यादरम्यान अर्शी म्हणाली की, मराठी भाषेत मी काम करत आहे, त्याचा मला गर्व वाटतो. मला ही भाषा आणि इथले लोक आवडतात. काही दिवसांपूर्वी जान कुमार सानूने बिग बॉसमध्ये मराठी भाषेचा अपमान केला होता. या अपराधासाठी त्याने मराठी भाषेतच माफी मागायला हवी.
अर्शी म्हणाली की, जानच्या माफीला काही अर्थ नाही. त्याने मराठीत बोलून सर्वांची माफी मागायला हवी. त्याला ही भाषा त्रासदायक वाटते तर मग आता त्याने याच भाषेत बोलून माफी मागायला हवी. आपण सर्व भाषांचा आदर करायला हवा. मी जर आत्ता बिग बॉसमध्ये असते, तर त्याला मराठीत बोलून अजून त्रास दिला असता.
‘मराठी भाषिकांची मनापासून माफी मागतो’, जान कुमार
जानने मराठी भाषेबद्दल केलेल्या वक्तव्यावरुन वादंग उठल्यानंतर बिग बॉसच्या घरात जान याला कन्फेशन रुममध्ये बोलवण्यात आलं होतं. यावेळी त्याला कोणतीही भाषा, धर्म आणि जात, सांप्रदाय यावर बिग बॉसच्या घरात चर्चा करण्यास मनाई असल्याचं सूचित करण्यात आलं. त्याचबरोबर बिग बॉसच्या घरात सर्वप्रकारच्या भाषा, जाती-धर्माच्या लोकांचं स्वागत केलं जातं, असंदेखील ठणकावून सांगण्यात आलं. त्यानंतर जानने माफी मागितली.
“माझ्याकडून नकळत एक चूक झाली, ज्यामुळे मराठी भाषिकांना आणि त्यांच्या अस्मितेला ठेच पोहोचली आहे. मी मराठी लोकांची मनापासून माफी मागतो. मराठी भाषिकांना वाईट वाटावं, असा माझा हेतू नव्हता. माझ्यामुळे बिग बॉसलाही शरमेने मान खाली घालाली लागली. त्यामुळे बिग बॉसचीही माफी मागतो. अशा प्रकारची चूक पुन्हा होणार नाही, याची मी काळजी घेईन”, अशा शब्दात जान याने माफी मागितली.
नेहमी वादाचा मुकूट आपल्या डोक्यावर घेवून मिरवणारी अभिनेत्री कंगना रानौत प....
अधिक वाचा