By PRIYANKA BAGAL | प्रकाशित: एप्रिल 27, 2019 02:22 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
हॉलिवूड प्रेमींची उत्सुकता ताणलेला चित्रपट अॅव्हेंजर्स एंडगेम हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आलाय. तर, हा चित्रपट प्रदर्शित होण्याआधीपासूनच प्रेक्षकांमध्ये कमालीची उत्सुकता पाहायला मिळालीय. त्यामुळे येत्या काळात भारतीय बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट किती कोटींचा गल्ला जमवतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. या चित्रपटाने भारतामध्ये पहिल्याच दिवशी दमदार कमाई केली आहे. चित्रपट व्यापार विश्लेषक तरण आदर्श यांनी ट्विट करुन ही माहिती दिलीय.
मार्व्हल सिनेमॅटिक युनिव्हर्सच्या सिरीजमधील ‘अॅव्हेंजर्स एंडगेम’ हा शेवटचा चित्रपट असून या चित्रपटाने पहिल्याच दिवशी भारतामध्ये ५३.१० कोटी रुपयांची कमाई केली आहे. गेल्या कित्येक महिन्यांपासून प्रेक्षक या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत होते. या चित्रपटाच्या कित्येक शोची अॅडव्हान्स बुकिंग देखील झाली होती. विशेष म्हणजे या चित्रपटाने प्रदर्शनापूर्वीच बॉक्स ऑफिसवर अनेक विक्रम मोडले आहेत.
नुकताच पंतप्रधान नरेंद्र मोदींची अभिनेता अक्षय कुमारने मुलाखत घेतली. या मु....
अधिक वाचा