By MACHHINDRANATH PAWAR | प्रकाशित: एप्रिल 28, 2019 06:18 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
ताहिरा आणि आयुष्मान हे एकमेकांना लहानपणापासून ओळखतात. कॉलेजमधलं प्रेम उत्तरोत्तर बहरत गेलं आणि त्यांनी 2008 मध्ये लग्न केलं. बॉलिवूड अभिनेता आयुष्मान खुरानाची बायको ताहिरा कश्यपने गेल्यावर्षी सप्टेंबर महिन्यात तिला ब्रेस्ट कॅन्सर झाल्याची माहिती तिनेच सोशल मीडियावर दिली होती. यासोबतच उपचारादरम्यानही ती तिचे फोटो आणि व्हिडीओ शेअर करून उपचार कसे सुरू आहेत त्याबद्दलही सांगायची. तिच्या या प्रवासात नवरा आयुष्माननेही तिला खंबीर साथ दिली. आयुष्माननेही तिच्या या सकारात्मक विचारांचं कौतुक केलं. आता पुन्हा एकदा तिने काही फोटो शेअर केले. यात तिने उपचारांदरम्यान तिचे केस कसे गळत गेले आणि अखेर तिला सगळे केस गमवावे लागले याची एक भावुक करणारी पोस्ट लिहिली आहे. या फोटोंमध्ये स्पष्ट दिसतं की केमोथेरपीमुळे ताहिराचे केस हळू हळू जायला लागले होते.
रात्रीस खेळ चालेच्या पहिल्या सिझनमध्ये अण्णांची भूमिका फार छोटी होती. निर्....
अधिक वाचा