ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

पानिपत बॉक्सऑफिसवर लढाई करताना पिछाडीवर...

By VISHRANTI SHINDE | प्रकाशित: डिसेंबर 09, 2019 06:54 PM 2019-02-12T14:15:30+5:30

पानिपत बॉक्सऑफिसवर लढाई करताना पिछाडीवर...

शहर : देश

आशुतोष गोवारीकर यांच्या बहुचर्चित 'पानीपत' या चित्रपटात अर्जुन कपूर आणि कृती सॅनॉन प्रथमच रुपेरी पडद्यावर एकत्र आले आहेत. या बरोबरच अभिनेता संजय दत्तनेही या चित्रपटात चमकदार अभिनयाची जोड देत सर्वांचे लक्ष वेधले आहे. परंतु असा हा बहुचर्चित चित्रपट पहिल्या आठवड्यात दर्शकांना म्हणावा तसा प्रभावित करू शकलेला नाही असं दिसून येत आहे. 


'पानीपत' चित्रपटाने महाराष्ट्रात चांगली कामगिरी करून दाखवली असली तरी हा चित्रपट उत्तर प्रदेशात मात्र तितकी चमकदार कामगिरी करू शकला नाही. कार्तिक आर्यन, अनन्या पांडे आणि भूमी पेडणेकर यांच्या 'पति पत्नी और वो' चित्रपटाने उत्तर प्रदेशात चांगली कामगिरी करत आहे. 'पती पत्नी और वो' हा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर अधिराज्य गाजवत असल्याचे स्पष्ट होत आहे. बी टाऊनमध्ये सध्या मोठी स्पर्धा सुरू असतानाही या स्पर्धेत 'पानिपत' या चित्रपटाने सरासरी व्यावसाय करून आपण स्पर्धेत असल्याचे दाखवले आहे. मात्र, या स्पर्धेत प्रेक्षकांना आपल्याकडे वळवण्यात 'पती पत्नी और वो' या चित्रपटाने चांगले यश मिळवले असल्याचे स्पष्ट झाले आहे. 


बॉक्सऑफिसिन्डिया डॉट कॉमवरील वृत्तानुसार, गोवारीकर यांच्या या चित्रपटाने पहिल्या आठवड्याच्या शेवटी एकूण १७ कोटी ५० लाख रुपयांचा व्यवसाय केला आहे. या चित्रपटाने प्रदर्शित होताच ४ कोटीचा व्यवसाय केला. दरम्यान, 'पानीपत' हा चित्रपट ' पागलपंती'पेक्षा कलेक्शनच्या दृष्टीने चांगले काम करेल अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. अर्जुन आणि कृती यांच्या प्रभावी कामगिरीने प्रेक्षकांनी या चित्रपटाचे आणि त्यांच्या अभिनयाच्या कौशल्याचे कौतुक केले आहे.

मागे

दक्षिण आफ्रिकेची 'जोजिबिनी टूंजी' हिने पटकवला 'मिस युनिव्हर्स २०१९' चा मान...
दक्षिण आफ्रिकेची 'जोजिबिनी टूंजी' हिने पटकवला 'मिस युनिव्हर्स २०१९' चा मान...

अटलांटा - अमेरिकेतील अटलांटामध्ये ६८ व्या 'मिस युनिव्हर्स' स्पर्धा संपन्....

अधिक वाचा

पुढे  

बॉलिवूडचा भाईजान 'दबंग ३' ने तब्बल १५५ कोटी रुपये प्रदर्शनापूर्वीच आपल्या खिशात जमा केले...
बॉलिवूडचा भाईजान 'दबंग ३' ने तब्बल १५५ कोटी रुपये प्रदर्शनापूर्वीच आपल्या खिशात जमा केले...

बॉलिवूडचा भाईजान सलमान खान चा 'दबंग ३' हा २०१९ मधील सर्वात जास्त कमाई करणा....

Read more