By VISHRANTI SHINDE | प्रकाशित: डिसेंबर 26, 2019 03:14 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
मुंबई - नागरिकत्व सुधारणा कायद्यावर अनेक बॉलिवूड कलाकार आपलं मत व्यक्त करत आहेत. कुणी या कायद्याला समर्थन देत आहेत तर काही जण या कायद्याला विरोध करत आहेत. काही दिवसांपूर्वी या कायद्याविरोधात आंदोलन करण्यात आलं त्यामध्ये अनेक बॉलिवूड कलाकार उपस्थित होते. आता अजय देवगनने देखील आपलं मत या कायद्याबाबतचे स्पष्ट केले आहे.
'द क्विंट' ला दिलेल्या मुलाखतीत अजय देवगन या कायद्यावर बोलला आहे. अजय म्हणतो की, 'बॉलिवूडचे कलाकार या मुद्यावर बोलू शकत नाहीत. जर आम्ही यावर काही बोलू तर लोकांना त्याच वाईट वाटेल. जर मी आणि सैफ काही बोललो तर लोकं जातील आणि उद्या प्रदर्शन करतील. एवढंच नव्हे तर माझा तान्हाजी सिनेमा देखील बॅन करतील. सिनेमावर बंदी घातल्यावर निर्मात्याचं नुकसान होतं. आणि या सिनेमाचा निर्माता मीच आहे.
या अगोदर असं आमिर खान आणि संजय लीला भन्साळी सारख्या व्यक्तींसोबत झालं आहे.' तो एवढ्यावरच थांबला नाही. पुढे अजय देवगन म्हणाला की,'सिनेमाच्या निर्मितीत अनेकांचा सहभाग असतो. सिनेमाचं नुकसान झालं तर ते नुकसान त्यांच देखील असतं. आमचं मत आहे पण आम्ही बाहेर जाऊन काही बोलू शकत नाही'.
अजय देवगनचा 'तान्हाजी' हा आगामी सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या सिनेमाच्या प्रदर्शनापूर्वीपासूनच वादाला सुरूवात झाली आहे. तब्बल 10 वर्षांनी काजोल आणि अजय एकत्र स्क्रिन शेअर करताना दिसणार आहेत.
‘नेटफ्लिक्स’ हे ऑनलाईन स्ट्रिमिंग क्षेत्रातील सर्वाधिक ल....
अधिक वाचा