ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

अमिताभ बच्चन यांचे राज्यपालांकडून अभिनंदन

By Sudhir Shinde | प्रकाशित: सप्टेंबर 25, 2019 12:48 PM 2019-02-12T14:15:30+5:30

अमिताभ बच्चन यांचे राज्यपालांकडून अभिनंदन

शहर : मुंबई

 महाराष्ट्राचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी अमिताभ बच्चन यांचे दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन केले आहे.

चित्रपट सृष्टीतील महानायक श्री अमिताभ बच्चन यांना अत्यंत प्रतिष्ठेचा दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर झाल्याचे समजून अतिशय आनंद वाटला. अभूतपूर्व लोकप्रियता लाभलेल्या अमिताभ बच्चन यांनी गेली चार दशके देशातील तसेच जगभरातील सिने रसिकांचे मनोरंजन केले आहे. अनेक सामाजिक मोहिमांना त्यांनी आपला बुलंद आवाज दिला आहे. त्यांची कार्यप्रती निष्ठा व उत्कटता पूर्वीइतकीच कायम आहे. महाराष्ट्र ही बच्चन यांची कर्मभूमी राहिली आहे. त्यामुळे या पुरस्काराचा राज्यातील लोकांना विशेष आनंद झाला आहे. राज्यातील जनतेतर्फे तसेच आपल्या स्वतःच्या वतीने श्री बच्चन यांचे या पुरस्काराबद्दल हार्दिक अभिनंदन करतो व यापुढेही त्यांना लौकिक व गौरव प्राप्त होवोअशा शुभेच्छा देतोअसे राज्यपालांनी आपल्या संदेशात म्हटले आहे.    

 

मागे

  अमिताभ बच्चन यांना दादासाहेब फाळके पुरस्कार
  अमिताभ बच्चन यांना दादासाहेब फाळके पुरस्कार

 अमिताभ बच्चन यांची 2018 दादासाहेब फाळके पुरस्कारासाठी निवड झाली आहे. केंद्....

अधिक वाचा

पुढे  

प्रसिद्ध विनोदवीर आणि अभिनेते वेणु माधव हयांच निधन
प्रसिद्ध विनोदवीर आणि अभिनेते वेणु माधव हयांच निधन

प्रसिद्ध तेलुगू अभिनेते व कॉमेडियन वेणू माधव यांचे वयाच्या 39 व्या वर्षी निध....

Read more