By SHEETAL CHAVAN | प्रकाशित: जून 06, 2019 01:33 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
ईद व सलमान खानचा चित्रपट हे जणू आता समीकरणच झालं आहे. प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगलीच मुसंडी मारली आहे. दरवर्षी ईदच्या मुहूर्तावर सलमान त्याच्या चाहत्यांसाठी चित्रपटाची भेट आणतो. अली अब्बास जफर दिग्दर्शित या चित्रपटाने पहिल्याच दिवशी दणक्यात कमाई केली आहे.
‘भारत’ने बुधवारी तब्बल ४२.३० कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे. विशेष म्हणजे या वर्षात प्रदर्शनाच्या दिवशीच सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांमध्ये ‘भारत’ अग्रस्थानी आहे. रमजानच्या दिवशी सलमानने त्याच्या चाहत्यांना चांगलीत ईदी दिली आहे. ‘भारत’ देशभरातील ४७०० स्क्रीन्सवर प्रदर्शित झाला आहे. ‘भारत’च्या प्रदर्शनाच्या दिवशीच विश्वचषकाचा भारताचा पहिला सामना होता. त्यामुळे या सामन्याचा कमाईवर परिणाम होईल असा अंदाज होता.
चाहत्यांमध्ये असणारं सलमानचं वेड आणि त्याला ईदचं निमित्त याचा फायदा चित्रपटाला झाला. पहिल्या दिवशी चित्रपटाने तब्बल ३० कोटी रूपयांचा गल्ला जमवला आहे. त्यामुळे आता येत्या दिवसात चित्रपट किती रूपयांची मजल मारतोय हे पाहणं औत्सुक्याचे ठरणार आहे. चित्रपटाच्या कमाईचा आकडा पाहता, चित्रपट प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यात यशस्वी ठरला आहे.
नेहाने रिॲलीटी शो 'इंडियन आयडॉल'मधून एक स्पर्धक म्हणून आपल्या करियरची ....
अधिक वाचा