ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

मुंबईच्या भर पावसात गाडीतून मोबाईल हिसकावला, अभिनेता भारत गणेशपुरेंचा थरारक अनुभव

By SHEETAL CHAVAN | प्रकाशित: ऑगस्ट 07, 2020 11:39 AM 2019-02-12T14:15:30+5:30

मुंबईच्या भर पावसात गाडीतून मोबाईल हिसकावला, अभिनेता भारत गणेशपुरेंचा थरारक अनुभव

शहर : मुंबई

चला हवा येऊ द्याफेम प्रसिद्ध अभिनेते भारत गणेशपुरे यांना मुंबईतील हायवेवर एका वाईट प्रसंगाला सामोरं जावं लागलं आहे (Bharat Ganeshpure share mobile thieving experience ). भर पावसात, ट्रॅफिक झालेली असताना एका टोळीने मदतीचं नाटक करत त्यांचा मोबाईल चोरला. स्वतः भारत गणेशपुरे यांनीच आपला हा थरारक अनुभव आपल्या चाहत्यांसोबत शेअर केला आहे. तसेच सर्व नागरिकांना असं काही घडलं, तर सावध राहण्याचं आवानह त्यांनी केलं. त्यांनी आपले अनुभव सांगणारा व्हिडीओ फेसबूकवर पोस्ट केला आहे.

भारत गणेशपुरे म्हणाले, “आज माझा मोबाईल अक्षरशः लुटून नेला आहे. ही घटना कांदिवलीतील वेस्टर्न एक्सप्रेस हायवेच्या फ्लाय ओव्हरवर घडली. काल दरड कोसळल्यामुळे तेथे खूप पाऊस होता, खूप ट्रॅफिक होती. त्यावेळी दोन माणसं आली आणि त्यांनी खूप विचित्र पद्धतीने माझी गाडी ठोठावली, मात्र तरीही मी काच उघडली नाही. मात्र, माझ्या दुसऱ्या बाजूला असलेल्या माणसाने कारचा दरवाजा उघडला. त्याक्षणी त्या व्यक्तीने ओकारी काढण्याचं नाटक केलं. त्याचवेळी माझ्या बाजूने एक माणूस आला आणि काच वाजवली. मी त्याच्याकडे पाहिलं, तर तितक्यात ओकारी काढणाऱ्या माणसाने माझा मोबाईल चोरुन नेला.”

तुम्हाला कुणी निर्दयी म्हटलं तरी गाडीची काच उघडू नका

माझ्यासोबत ही घटना घडली आहे. मात्र, तुम्ही सतर्क राहा. सध्या कोरोनाची स्थिती आहे. कोरोनामुळे फार विचित्र परिस्थिती निर्माण झाली आहे. जर तुमच्यासोबत अशापद्धतीची घटना घडली तर आधी तुमची गाडी बंद (लॉक) करा. काच उघडू नका. तुम्हाला कुणी निर्दयी म्हटलं तरी चालतंय. दिवस वाईट आहेत. या प्रकारात बायका, मुलं, लहान मुलं अशी टोळी असते,” असं गणेशपुरे यांनी सांगितलं.

पुढे  

मुंबईच्या भर पावसात गाडीतून मोबाईल हिसकावला, अभिनेता भारत गणेशपुरेंचा थरारक अनुभव
मुंबईच्या भर पावसात गाडीतून मोबाईल हिसकावला, अभिनेता भारत गणेशपुरेंचा थरारक अनुभव

‘चला हवा येऊ द्या’ फेम प्रसिद्ध अभिनेते भारत गणेशपुरे यांना मुंबईतील हा....

Read more