By GARJA ADMIN | प्रकाशित: मार्च 25, 2019 07:20 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
बॉलिवूडमध्ये अनेक थोर व्यक्तिंवर बायोपिक साकारण्याची तयारी सुरू आहे. अनेक कर्तृत्ववान व्यक्तींची कारकिर्द उलगडणारा जीवनप्रवास बायोपिकच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या समोर येणार आहे. अभिनेता अजय देवगणची मुख्य भूमिका असणारा 'भुज- प्राइड ऑफ इंडिया' चित्रपट १४ ऑगस्ट २०२० मध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात तो स्क्वाड्रन लीडर विजय कर्णिक यांची व्यक्तीरेखा साकारणार आहे. ट्रेड अॅनलिस्ट तरण आदर्श यांनी चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या दिवसाची घोषणा ट्विटरच्या माध्यमातून केली.
'भुज- प्राइड ऑफ इंडिया' चित्रपट १४ ऑगस्ट २०२० रोजी प्रदर्शित करण्यामागे एक प्रमुख उद्देश आहे. १९७१ च्या भारत- पाकिस्तान युद्धादरम्यान महिलांनी मोलाची कामगिरी बजावली होती. त्यांच्या या अप्रतिम कामगिरीला उजाळा देण्यासाठी चित्रपट १४ ऑगस्ट २०२० मध्ये प्रदर्शित करण्यात येणार आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, 'भुज- प्राइड ऑफ इंडिया' गुजरातच्या माधापुर येथील ३०० महिलांच्या शौर्यावर बेतलेला चित्रपट आहे. ज्यांनी १९७१ साली झालेल्या युद्धात भारताला यश मिळवून देण्यास एक महत्वाची भूमिका साकारली होती. चित्रपटात अजय मुख्य भूमिका साकारणार असून संजय रणछोडदास 'पागी' भूमिकेला न्याय देताना दिसणार आहे.
चित्रपटात संजय दत्त, सोनाक्षी सिन्हा, राणा दग्गुबाती, परिणीति चोप्रा आणि एम्मी विर्क मुख्य भूमिकेत झळकणार आहेत. अभिषेक दुधैया या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार असून, गिन्नू खनूजा, वजिर सिंग, भूषण कुमार, कृष्ण कुमार आणि अभिषेक दुधैया यांनी चित्रपटाच्या निर्मितीची जबाबदारी घेतली आहे.
बॉलिवूडचा सीरियल किसर इमरान हाशमी तुम्हाला माहितीच आहे. पण, पाकिस्तानच....
अधिक वाचा