By DAYANAND MOHITE | प्रकाशित: एप्रिल 19, 2019 05:31 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
तापसी पन्नू आणि भूमी पेडणेकर गेल्या काही दिवसांपासून 'सांड की आंख' चित्रपटाच्या चित्रीकरणामध्ये व्यस्त आहेत. या चित्रपटात दोन्ही अभिनेत्रींच्या लुक्सवर, मेकअपवर मोठं काम करण्यात आलं आहे. तापसी पन्नू आणि भूमी पेडणेकर वृद्धोवृद्ध खेळाडू महिलांची भूमिका साकारत आहेत. परंतु या चित्रपटाच्या चित्रीकरणावेळी भूमीचा चेहरा गंभीर होरपळला असून चेहऱ्यावर जळल्याचे गंभीर डाग पडले आहेत. भूमिचा हा फोटो सोशल मिडियावर व्हायरल होत आहे.भूमीचा व्हायरल फोटो समोर आल्यानंतर सुरुवातीला चेहऱ्यावरील डाग मेकअप असल्याचं वाटत होतं. परंतु नंतर खरोखरंच भूमीचा चेहरा खराब झाल्याचं समजलं आहे. मेकअपमुळे भूमीच्या चेहऱ्यावर जळल्याचे डाग दिसत आहेत. कडक उन्हाळा आणि उष्णतेमध्ये चित्रपटातील भूमिकेनुसार केल्या गेलेल्या अति भडक मेकअपमुळे भूमीचा चेहरा होरपळला असून चेहऱ्यावर जळल्याचे डाग पडले आहेत.चित्रपट 'सांड की आंख'च्या क्रू मेंबरने बॉलिवूड लाइफला दिलेल्या वृत्तानुसार, चित्रपटात भूमी एका वृद्ध महिलेची भूमिका साकारत आहे. त्यासाठी तिला दररोज कमीत कमी 3 तास मेकअप करावा लागतो. चित्रपटाचं चित्रीकरण उत्तरप्रदेशमध्ये होत आहे. या दिवसांत तिथे कडाक्याचं ऊन असून दररोज 8 तास शूटिंग सुरु असतं. या संपूर्ण वेळेत भूमी चेहऱ्यावर हेवी मेकअप ठेऊन काम करते. त्यामुळे ऊन आणि धुळीमुळे भूमीच्या चेहरा जळल्यासारखा झाला असून त्वचेवर डाग पडले आहेत. तुषार हीरानंदानी दिग्दर्शित 'सांड की आंख'मध्ये भूमि पेडणेकर चंद्रो तोमर यांची भूमिका साकारणार आहे.
हम दिल दे चुके सनम या चित्रपटात सलमानने भन्साळींसोबत काम केले होते. त्यानंत....
अधिक वाचा