ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

सपना चौधरींच्या गाडीला अपघात

By VISHRANTI SHINDE | प्रकाशित: डिसेंबर 28, 2019 02:18 PM 2019-02-12T14:15:30+5:30

सपना चौधरींच्या गाडीला अपघात

शहर : delhi

          नवी दिल्ली - हरियाणाची प्रसिद्ध गायिका आणि डान्सर सपना चौधरीच्या गाडीला अपघात झाला आहे. शॉपिंग करण्यासाठी गेलेल्या सपना चौधरीच्या फॉर्च्युनर गाडीला वेगाने आलेल्या एका गाडीने मागून धडक दिली. नवी दिल्लीतील गुरुग्राम या ठिकाणी हा अपघात घडला. सुदैवाने सपना चौधरी या अपघातात बचावली आहे.

 

            मिळालेल्या माहितीनुसार, काल (27 डिसेंबर) गुरुवारी संध्याकाळच्या सुमारास सपना आपल्या ड्रायव्हरसोबत शॉपिंगसाठी गेली होती. त्यावेळी दिल्लीतील वाटिका चौकाजवळ मागून वेगाने आलेल्या एका गाडीने तिच्या फॉर्च्यूनर गाडीला धडक दिली.


         सपनाच्या ड्रायव्हरने त्या गाडीच्या चालकाला थांबवण्याचा प्रयत्न केला. मात्र चालकाने त्या ठिकाणाहून पळ काढला. यामुळे सपनाच्या गाडीला धडक दिलेल्या गाडीचा नंबर किंवा कार चालकाची ओळख अद्याप नाही.


        मात्र यात तिच्या गाडीचे नुकसान झाले आहे. याबाबत तिने अद्याप कोणतेही तक्रारी केलेली नाही. पण जर याबाबत तक्रार आली तर त्या चालकावर नक्कीच कारवाई केली जाईल. असे पोलिसांनी सांगितले आहे.


        दरम्यान सपना चौधरीने हरियाणातील चित्रपटात काम केले आहे. त्यानंतर ती हिंदी बिग बॉसमध्येही दिसली होती. बिग बॉसमध्ये ती चांगलीच चर्चेत आली होती. घराघरात तिच्या नावाचीच चर्चाही रंगू लागल्या होत्या. विशेष म्हणजे बिग बॉसमधून बाहेर पडल्यानंतर तिला लगेचच भोजपूरी चित्रपटाची ऑफर मिळाली होती.
 

मागे

‘वेगळी वाट’ची वडील आणि मुलीची  मनःस्पर्शी पटकथा      
‘वेगळी वाट’ची वडील आणि मुलीची  मनःस्पर्शी पटकथा      

          मराठी चित्रपटांचे आशय-विषय हे नेहमीच प्रेक्षकांना विचार करण्....

अधिक वाचा

पुढे  

अभिनेता सुबोध भावेला भीती नेमकी कसली आहे? वाचा...
अभिनेता सुबोध भावेला भीती नेमकी कसली आहे? वाचा...

          भय बर्‍याच वेळा प्रसंगानुरूप असते, त्यामुळे ते कोणत्या गो....

Read more