By DAYANAND MOHITE | प्रकाशित: नोव्हेंबर 14, 2020 01:47 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
‘बिग बॉस 14’च्या (Bigg Boss 14) घरात रोजच काहीना काही नवीन नाटक पाहायला मिळते. घरातले स्पर्धक कधी एकमेकांचे दोस्त असतात, तर दुसऱ्या क्षणाला ते एकमेकांचे कट्टर वैरी होतात. अली गोनी या आठवड्यात घराचा कर्णधार बनला आहे. अली कॅप्टन बनल्यापासून निक्की तंबोलीने (Nikki Tamboli) घरात हंगामा सुरू केला आहे. आता निक्की तिचा खास मित्र जान कुमार सानूला तुरुंगात टाकण्याची इच्छा व्यक्त केली आहे. निक्कीनी जान कुमार सानूवर (Jaan Kumar Sanu) गंभीर आरोप लावला आहे
यंदाच्या पर्वात पहिल्यांदाच बिग बॉसच्या घरात तुरुंगाचा टास्क पार पडला. या टास्कमध्ये घरातील प्रत्येक स्पर्धकाला त्यांच्या दोन प्रतिस्पर्ध्यांची नावे तुरुंगात जाण्यासाठी नॉमिनेट करायची आहेत. या टास्कदरम्यान कविता कौशिकने पवित्रा पुनिया आणि एजाज खान यांचे नाव नॉमिनेट केले आहे. या दोन्ही ‘लवबर्ड्स’नी तुरुंगात राहावे अशी तिची होती. यावरून एजाज आणि कवितामध्ये वाददेखील झाले.
निक्कीचे जानवर आरोप
या खेळात तुरुंगात जाण्यासाठी निक्की तंबोलीने जान कुमार सानूचे नाव घेतले. यावेळी संतापलेली निक्कीने जान कुमार सानूवर गंभीर आरोप केला. ती म्हणाली, ‘एखाद्या मुलीचे तिच्या मर्जीविरुद्ध चुंबन घेणे अपमानास्पद असते. यासाठी तुला तुरुंगात जावेच लागेल.’ यावेळी अली गोनीने निक्कीचे समर्थन केले. निक्की नको म्हणत असतानाही तिच्या मागे फिरणाऱ्या जानला त्याने चांगलेच खडे बोल सुनावले. जर कोणी नाही म्हणत असेल, तर त्याचा अर्थ नाही असाच होतो, असे अलीने जानला सांगितले. यावर जानने आपली बाजू मांडण्याचा प्रयत्न केला. जर, मी तिच्या मर्जी विरुद्ध चुंबन घेतो, तर ती पुन्हा मला चुंबन का देते, असा प्रश्न त्याने उपस्थित केला. सुरुवातीला निक्की आणि जानमध्ये चांगली मैत्री होती. मात्र, सध्या त्यांच्या नात्यात दुरावा आला आहे. भाषावादानंतर जान कुमार सानूवर पुन्हा एकदा गंभीर आरोप झाल्याने, त्याच्या अडचणीत वाढ होताना दिसत आहे.
निक्कीचे हट्ट
अली गोनी कर्णधार झाल्यावर घरात निक्कीसाठी बर्याच वेळा ‘कुकडू कु’ वाजवला गेला होता. निक्की बराच वेळ घरात झोपून राहिली होती. ‘बिग बॉस’चा गजर वाजत असूनही निक्कीला फारसा फरक पडला नव्हता. अलीने निक्कीला शक्य तितक्या सगळ्या मार्गाने समजावण्याचा प्रयत्न केला. पवित्रा आणि एजाज यांनीही अली आणि निक्की यांच्यात समजोता करण्याचा प्रयत्न केला. निक्कीचा हा हट्ट पाहून शेवटी अलीनेही तिला तिच्याच भाषेत समजवण्याचा निश्चय केला आहे.
बॉलीवूडचा दिग्गज अभिनेता अक्षय कुमारचा ‘लक्ष्मी’ हा चित्रपट 9 नोव्हें....
अधिक वाचा