By DAYANAND MOHITE | प्रकाशित: एप्रिल 16, 2019 12:08 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
लोकसभा निवडणूकांची सुरूवात ११ एप्रिलपासून झाली आहे. सर्वत्र निवडणूकींच्या चर्चा रंगताना दिसत आहेत. सामान्या जनतेपासून ते सेलेब्रिटींपर्यत फक्त राजकीय चर्चांना उधान आले आहे. या निवडणूकीच्या मोसमात प्रदर्शित होणाऱ्या चित्रपटांना मोठा फटका बसत आहे. मागील काही दिवसांमध्ये प्रदर्शित झालेल्या चित्रपटांना मोठा तोटा सहन करावा लागत आहे. येत्या १७ तरखेला तगडी स्टारकास्ट असलेला 'कलंक' चित्रपट प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे 'कलंक' चित्रपटाला सुद्धा हा फटका बसण्याची शक्यता आहे.
वरिष्ठ पत्रकार कुमार मोहन यांच्या माहितीनुसार चित्रपटांच्या व्यावसायामध्ये ७० टक्के घट झाली आहे. एकीकडे निवडणूक तर दुसरीकडे आयपीएल चित्रपटांवर धोक्याचे सावट म्हणून फिरत आहे. निवडणूकींच्या काळात चित्रपट पहिल्या आठवड्यात फक्त ३० टक्क्यांपर्यंत मजल मारत आहे. 'कलंक' चित्रपट प्रदर्शित होण्यासाठी एक दिवस बाकी आहे. चित्रपटाचे अॅडव्हांस बुकींग सुरू झाले आहे. चित्रपटने पहिल्या आठड्यात चाहत्यांना आकर्षीत करण्याची गरज आहे.
प्रेक्षकांना मनोरंजन हवे असेल तर ते चित्रपटगृहांकडे वळतात. पण सध्या निवडणूकींच्या चर्चा सर्वांचे मनोरंजन करत आहे, असे वक्तव्य वरिष्ठ पत्रकार आणि चित्रपट समिक्षक इंदर मोहन पन्नू यांनी केले आहे. ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर चाहत्यांमध्ये चित्रपटाची उत्कंठा शिगेला पोहचली आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन अभिषेक वर्मन यांनी केले आहे. फॉक्स स्टार स्टुडिओज, धर्मा प्रोडक्शन, नाडियादवाला ग्रँडसन्स एंटरटेन्मेंट यांची निर्मिती असणारा हा चित्रपट १७ एप्रिलला प्रदर्शित होणार आहे.
मनोरंजन क्षेत्रातील सेलिब्रिटींच्या वैयक्तिक आणि सामाजिक आयुष्याबद्दल ज....
अधिक वाचा