ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

Happy Birthday Hema Malini| वयाच्या 72व्या वर्षीही हेमा मालिनी ‘सुपर फिट, ‘ड्रीमगर्ल”फिटनेसचे रहस्य!

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: ऑक्टोबर 16, 2020 02:30 PM 2019-02-12T14:15:30+5:30

Happy Birthday Hema Malini| वयाच्या 72व्या वर्षीही हेमा मालिनी ‘सुपर फिट, ‘ड्रीमगर्ल”फिटनेसचे रहस्य!

शहर : मुंबई

बॉलिवूडच्याड्रीमगर्ल म्हणजेच अभिनेत्री हेमा मालिनी (Hema malini) आज (16 ऑक्टोबर) आपला 72वा वाढदिवस (Birthday) साजरा करत आहेत. आजही उत्तम नृत्य, अभिनय आणि सौंदर्याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणून हेमा मालिनी प्रसिद्ध आहेत. वयाच्या 72व्या वर्षीही हेमा मालिनी यांचे सौंदर्य आणि फिटनेस लोकांना घायाळ करते. स्वत: ला फिट ठेवण्यासाठी हेमा मालिनी योगा, सायकलिंग आणि हेल्दी डाएट या त्रिसूत्रीचा अवलंब करतात. आपल्याला देखील हेमा मालिनींसारखे सुंदर आणि फिट दिसण्याची इच्छा असल्यास, त्यांच्या या त्रिसूत्रीचे पालन केले पाहिजे.

योगा आणि प्राणायाम

हेमा मालिनी आजही नृत्याचे कार्यक्रम सादर करतात. मुली इशा आणि आहानासह त्या शास्त्रीय नृत्याचे स्टेज शो आयोजित करतात. नृत्याव्यतिरिक्त हेमा मालिनी योगाकडेही खूप लक्ष देतात. त्या दररोज सकाळी 45 ते 50 मिनिटे योगा करतात. यासह स्वत: ला फिट ठेवण्यासाठी हेमा मालिनी 20 ते 25 मिनिटे सायकलही चालवतात. तंदुरुस्तीचा परिणाम आपल्या चेहऱ्यावरही दिसून येतो, असे म्हणणाऱ्या हेमा मालिनी प्रत्येकाला शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त राहण्याचा सल्ला देतात.

सकस आहार आणि डाएट

व्यायामाबरोबरच निरोगी आहारही फिटनेससाठी खूप महत्त्वाचा असल्याचे हेमा मालिनी सांगतात. त्या नियमितपणे सकस आहाराचे सेवन करतात. त्यांना शाकाहारी आणि घरी बनवलेले जेवण अधिक आवडते. हेमा मालिनी त्यांच्या आहारात साखरेचा अजिबात समवेश करत नाहीत. साखरेऐवजी त्या मधाचा वापर करतात. हेमा मालिनी आपल्या आहारात भाज्या आणि फळांना अधिक महत्त्व देतात. स्वत:ला तंदुरुस्त ठेवण्यासाठी हेमाजी आठवड्यातून दोन दिवस उपवास करतात. या दरम्यान त्या फळेसुका मेवा आणि पनीर खातात.

भरपूर पाणी पिण्याचा सल्ला

फिटनेस फ्रिक हेमा मालिनी देखील सकस आहारासह भरपूर पाणी पितात. एका मुलाखती दरम्यान हेमा मालिनी यांनी सांगितले की, त्या आपल्या त्वचेचा तजेला टिकवून ठेवण्यासाठी भरपूर पाणी पितात. अधिक पाणी पिण्यामुळे शरीर डीहायड्रेट होत नाही. यामुळे दिवसभर शरीरात स्फूर्ती राहते.

मागे

नोरा फतेहीने इन्स्टाग्रामवर ठेवला असा DP की चाहते गडबडले
नोरा फतेहीने इन्स्टाग्रामवर ठेवला असा DP की चाहते गडबडले

बॉलिवूड अभिनेत्री आणि सुप्रसिद्ध डान्सर नोरा फतेही (Nora Fatehi) सध्या सोशल मीडिया....

अधिक वाचा

पुढे  

'लक्ष्मी बॉम्ब' सिनेमाच्या प्रदर्शनावर बंदी घाला; हिंदु जनजागृती समितीची मागणी
'लक्ष्मी बॉम्ब' सिनेमाच्या प्रदर्शनावर बंदी घाला; हिंदु जनजागृती समितीची मागणी

दिवाळीच्या पार्श्‍वभूमीवर अभिनेता अक्षय कुमार याचा 'लक्ष्मी बॉम्ब' हा ....

Read more