By MACHHINDRANATH PAWAR | प्रकाशित: मे 14, 2019 11:50 AM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : देश
तेजस्वी सूर्या यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना रियल हिरो म्हटलं आहे. त्यांनी मोदींची तुलना थेट अॅव्हेंजर्सच्या सुपरहिरोंशी केली. मोदी सर्वच सुपरहिरोंपेक्षा अधिक सामर्थ्यवान असल्याचे त्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे. यामध्ये त्यांनी सुपरहिरोंसोबतचा मोदींचा फोटो पोस्ट केला आहे. सध्या सोशल मीडियावर हा फोटो व्हायरल झाला असून सूर्या यांचे ट्विट सहा हजाराहून अधिक लोकांनी रिट्विट केलं आहे.
’हल्कपेक्षा जास्त ऊर्जा, कॅप्टन अमेरिकेपेक्षा जास्त चपळता, थॉरपेक्षा जास्त वजन उचलण्याची क्षमता, आयर्नमॅनपेक्षा उत्तम व्हिजन, ब्लॅक विडोपेक्षा चांगली रणनिती. नरेंद्र मोदी- काल्पनिक हिरोंसोबत खरे हिरो’ असं दक्षिण बंगळुरुचे भाजपा उमेदवार तेजस्वी सूर्या यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे. यासोबत त्यांनी एक फोटोदेखील ट्विट केला आहे. यात मोदी कॅप्टन अमेरिका, आयर्नमॅन, हल्क, ब्लॅक विडो आणि थॉरसोबत दिसत आहेत. 28 वर्षांच्या तेजस्वी सूर्या यांना भाजपानं दक्षिण बंगळुरुतून लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं आहे. सूर्या यांनी पोस्ट केलेल्या फोटोची ट्विटरवर जोरदार चर्चा आहे. 25 हजार जणांनी हे ट्विट लाईक केलं असून 2 हजार जणांनी त्यावर कमेंट केली आहे. तर 6 हजाराहून अधिक जणांनी हे ट्विट रिट्विट केलं आहे. हे मोदी आहेत, ममता बॅनर्जी नाहीत, असा टोला लगावत त्यांनी या ट्विटमध्ये विनोदवीर कुणाल कामराला मेन्शन केलं आहे.
बॉलिवूडचा दबंग सलमान खान लाखो चाहत्यांच्या मनात घर करुन आहे. सरोगसीच्या म....
अधिक वाचा