ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

सारं कलाविश्व शोकसागरात असतानाच,आजोबांच्या निधनानंतर लगेचच अजयच्या लेकीची सलूनमध्ये धाव

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: मे 29, 2019 12:53 PM 2019-02-12T14:15:30+5:30

सारं कलाविश्व शोकसागरात असतानाच,आजोबांच्या निधनानंतर लगेचच अजयच्या लेकीची सलूनमध्ये धाव

शहर : मुंबई

इंटरनेट आणि सोशल मीडिया यांची उपलब्धता आणि वाढता वापर पाहता या साऱ्याचे थेट परिणाम हे अनेकांच्याच खासगी आयुष्यावरही होत आहेत. यामध्ये सर्वाधिक फटका बसतो तो म्हणजे सेलिब्रिटींना. एखादा फोटो किंवा व्हिडिओ सेलिब्रिटींकडून पोस्ट करतात किंवा इतर माध्यमातून त्याच्याविषयीची चर्चा होताना असा एखादा मुद्दा हेरुन त्याच मुद्द्यावर सेलिब्रिटींची खिल्ली उडवली जाते, त्यांच्यावर टीका करण्यात येते. सोशल मीडियावर होणाऱ्या या ट्रोलिंगमध्ये अभिनेता अजय देवगणची मुलगी न्यासा पुन्हा एकदा अडकली आहे. आजोबा, म्हणजेच अजय देवगचे वडील वीरू देवगण यांच्या निधनामुळे सारं कलाविश्व शोकसागरात बुडालं होतं. या घटनेला एक दिवस उलटत नाही तोच न्यासा चर्चेत आली. मंगळवारी न्यासाला मुंबईतील एका नामांकित सलूनबाहेर पाहायला मिळालं.

न्यासाचे फोटो काही सेलिब्रिटी छायाचित्रकारांनी सोशल मीडियावर पोस्ट करतात, कमेंट बॉक्समध्ये अनेकांनीच तिच्याविरोधात टीप्पणी करण्यास सुरुवात केली. 'तिला झालंय तरी काय, काल हिच्या आजोबांचं निधन झालं आणि आज ही सलूनमध्ये जात आहे...', असं म्हणत तिच्यावर टीकेची झोड उठवण्यात आली.

एकिकडे न्यासाला निशाण्यावर धरलं जात असतानाच दुसरीकडे मात्र काही नेटकऱ्यांनी तिची पाठराखण केल्याचंही पाहायला मिळालं. त्यांमुळे ट्रोलर्समध्येही दोन गट पडल्याचं पाहायला मिळालं. दरम्यान, सोशल मीडियावर यापूर्वीही न्यासावर टीका करण्यात आली होती. तोकड्या कपद्यांच्या मुद्द्यामुळे ती चर्चेत आली होती.

 

 

 

मागे

भारतीय चित्रपट विश्वाविषयी आम्हाला फार माहिती नाही; ऑस्करच्या अध्यक्षांची कबुली
भारतीय चित्रपट विश्वाविषयी आम्हाला फार माहिती नाही; ऑस्करच्या अध्यक्षांची कबुली

ऑस्कर अकादमी अर्थात 'अकॅडमी ऑफ मोशन पिक्चर्स, आर्ट्स अँड सायन्स'च्या अध्....

अधिक वाचा

पुढे  

वीरू देवगण यांच्या जळत्या चितेसमोर नुसते बसून होते अमिताभ बच्चन
वीरू देवगण यांच्या जळत्या चितेसमोर नुसते बसून होते अमिताभ बच्चन

हिंदी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अ‍ॅक्शन कोरिओग्राफर आणि अभिनेता अजय देवगणच....

Read more