By DAYANAND MOHITE | प्रकाशित: ऑक्टोबर 07, 2019 01:04 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान हा सध्या त्याच्या आगामी चित्रपटांवर लक्ष केंद्रीत आहे. असा हा अभिनेता येत्या काळात 'लाल कप्तान' या त्याच्या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. काही दिवसांपूर्वीच त्याच्या या चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आलाय ज्यानंतर आता या चित्रपटाचा नवा पोस्टर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.
नवरात्र, दसरा या दिवसांचं औचित्य साधत या चित्रपटांचं नवं पोस्टर प्रदर्शित करण्यात आलं आहे. 'एन एच १०' फेम दिग्दर्शक नवदीप सिंग याच्या दिग्दर्शनात साकारलेल्या या चित्रपटाचा नवा पोस्टर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या पोस्टरमध्ये सैफचं रावणरुप पाहायला मिळत आहे. सैफ साकारत असणाऱ्या पात्राची ही रुपं पाहताना प्रथनदर्शनी धडकीच भरते. पण, खऱ्या अर्थाने हे पोस्टर चित्रपटाची उत्सुकता वाढवत आहे हेसुद्धा तितकंच खरं.
चित्रपट व्यापार विश्लेषक तरण आदर्श यांनी ट्विट करत हे पोस्टर सर्वांच्या भेटीला आणलं. ज्याची चर्चा सध्या कलाविश्वात पाहायला मिळत आहे. यामध्ये विविध भावमुद्रा असणारा सैफ पाहताना त्याच्या भूमिकेतील बरेच बारकावेही नजरेत येत आहेत.
अगदी डोळ्यांत दिसणारा दाह असो किंवा मग जटाधारी केसांना बांधलेलं लाल रंगाचं कापड असो; हे पोस्टर चित्रपटाविषयीचे काही प्रश्न उपस्थित करुन जात आहे. १८ ऑक्टोबरला प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटामध्ये सैफ व्यतिरिक्त अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा हिसुद्धा झळकणार आहे. शिवाय मानव वीज, झोया हुसैन, दीपक डोब्रियाल हे चेहरेही या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत.
मराठी चित्रपट आणि हिन्दी चित्रपटातही आपल्या अभिनयाने वेगळा ठसा उमटवणारे आ....
अधिक वाचा