By PRIYANKA BAGAL | प्रकाशित: एप्रिल 24, 2019 04:24 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
अभिनेता शाहरुख खान हा त्याच्या कलाविश्वातील कारकिर्दीमुळे नेहमीच प्रकाशझोतात असतो. शाहरुखचा अंदाज आणि त्याची एकंदर लोकप्रियता पाहता फक्त हिंदी भाषिक प्रेक्षक किंवा बॉलिवूडप्रेमींमध्येच नव्हे तर, दाक्षिणात्य कलाविश्वातही त्याचं वेड पाहायला मिळतं. असा हा किंग खान येत्या काळात एका तमिळ चित्रपटातून झळकणार असल्याची चर्चा आहे. मुख्य म्हणजे या चित्रपटात तो नकारात्मक अर्थात खलनायकी भूमिकेत झळकणार असल्याची चर्चा आहे. अभिनेता विजयची भूमिका असणाऱ्या Thalapathy 63 'तालापथी ६३' या चित्रपटात शाहरुखला ही भूमिका दिली असल्याचं म्हटलं जात आहे. त्याविषयीची अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. पण जर हे वृत्त खरं असेल तर शाहरुखचा तमिळ चित्रपटसृष्टीत हा दुसरा चित्रपट असेल. यापूर्वी त्याने २००० मध्ये प्रदर्शित झालेल्या 'हे राम' या चित्रपटातून तो झळकला होता. फिल्मफेअरने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार या चित्रपटात शाहरुखची एक महत्त्वाची भूमिका असेल. विजयशी लढतानाच्या दृश्यात तो झळकणार असून, निर्माते आणि दिग्दर्शकांना हिंदी कलाविश्वातील एक प्रसिद्ध चेहरा हवा होता. त्यातही जेव्हा एटली कुमारने शाहरुखकडे याविषयीची विचारणा केली तेव्हा त्याच्याकडून काही अंशी सकारात्मक प्रतिसाद मिळाला. चेन्नईत त्याच्या या भूमिकेसाठी चार ते पाच दिवसांच्या चित्रीकरणाचा बेत आखण्यात येणार असल्याचं म्हटलं जात आहे.
सैराट फेम आर्चीने प्रेक्षकांची मने जिंकली होती. आता ती कागर चित्रपटाच्या म....
अधिक वाचा