By DAYANAND MOHITE | प्रकाशित: सप्टेंबर 14, 2020 11:47 AM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
अभिनेता सोनू सूद कोरोना काळात आपल्या सामाजिक कामांमुळं चांगलाच प्रसिद्धीस आला आहे. लॉकडाऊनमध्ये फसलेल्या मजुरांसाठी मसिहा ठरलेल्या सोनू सूदनं अनेक मजुरांना रोजगार देण्याचं देखील काम केलं आहे. एवढंच नाही तर सोनूनं गरीबांना रोजगार देण्याचं काम तर केलंच आणि मुलांच्या शिक्षणासाठी सामग्री देण्याचं काम सुरु केलं आहे. आता सोनूनं मुलांच्या उच्च शिक्षणासाठी एक पाऊल पुढं टाकलं आहे. त्याने मुलांना उच्च शिक्षणासाठी स्कॉलरशिप सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे.
सोनू सूद आता मुलांना उच्च शिक्षणासाठी स्कॉलरशिप देणार आहे. कारण त्या मुलांच्या शिक्षणात काही कमी पडू नये. सोनू सूदनं आपल्या आईच्या नावे ही स्कॉलरशिप सुरु केली आहे. सोनूनं एक ट्वीट करत म्हटलं आहे की, 'आपलं भविष्य आपली ताकत आणि मेहनतच सिद्ध करणार आहे. आपण कुठुन आलो, आपली आर्थिक स्थिती कशी आहे, याचा याच्याशी काही संबंध नाही. एक प्रयत्न आता मी करत आहे. शाळेनंतरच्या शिक्षणासाठी पूर्ण स्कॉलरशिप. ज्यामुळं तुम्ही आपलं उच्च शिक्षण पूर्ण करु शकाल, यासाठी scholarships@sonusood.me यावर मेल करा', असं सोनू सूदनं म्हटलं आहे.
Hindustaan Badhega Tabhi, Jab Padhenge Sabhi!
Launching full scholarships for students for higher education.I believe,financial challenges should not stop any one from reaching their goals.Send in ur entries at scholarships@sonusood.me (in next 10 days) & I will reach out to uमागे
काय वाकडं करायचंय ते करा; कंगनाचं शिवसेनाला जाहीर आव्हान
शिवसेना नेते संजय राऊत यांनी मुंबई मराठी माणसाच्या बापाचीच, आहे असे ठणकावू....
अधिक वाचा