ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

निवडणूक निकालाच्या दुसऱ्याच दिवशी 'पीएम नरेंद्र मोदी' प्रेक्षकांच्या भेटीला

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: मे 20, 2019 01:59 PM 2019-02-12T14:15:30+5:30

निवडणूक निकालाच्या दुसऱ्याच दिवशी 'पीएम नरेंद्र मोदी' प्रेक्षकांच्या भेटीला

शहर : मुंबई

लोकसभा निवडणूक आणि निवडणूक आयोगाची नियमावली पाहता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवनप्रवासावर बेतलेल्या 'पीएम नरेंद्र मोदी' चित्रपटाच्या वाटेत गेल्या काही दिवसांपासून बऱ्याच अडचणी येत आहेत. अशा परिस्थितीतच आता एका पत्रकार परिषदेत खुद्द अभिनेता विवेक ओबेरॉय याने चित्रपट २४ मे या तारखेला प्रदर्शित होणार असून आपण, चित्रपटाच्या यशाविषयी विश्वास व्यक्त केला. नागपूर येथे चित्रपटाच्या पोस्टरच्या अनावरण सोहळ्यानंतर माध्यमांशी संवाद साधताना त्याने आपली भूमिका मांडली.

रविवारीच जाहीर झालेल्या लोकसभा निवडणुकांच्या एक्झिट पोलविषयीसुद्धा विवेकने त्याची प्रतिक्रिया दिली. देशभरातील जनतेचं नरेंद्र मोदी यांच्यावर असणारं प्रेम पाहता एक्झिट पोलमध्ये आलेली आकडेवारी ही आनंददायी आणि समाधानकारक असल्याचं तो म्हणाला. एक्झिट पोल जाहीर होण्यापूर्वी मोदींविषयी बऱ्याच चर्चा होत्या, आपण परिस्थितीला घाबरून गेलो नाही, असं म्हणत विवेकने चित्रपट मे महिन्याच्या २४ तारखेला प्रदर्शित होणार असल्याचं जाहीर केलं. गेल्या साठ वर्षांपासून देशाच्या प्रगतीच्या वाटेत जे काही खड्डे खणले गेले ते खड्डे बुझवून आता त्यावर विकासाची इमारत बांधली जाणार असल्याचं म्हणत विवेकने मोदी सरकारच्या कार्यपद्धतीचं समर्थन केलं.

पत्रकार परिषदेत माध्यमांच्या प्रश्नांची उत्तरं देत त्याने चित्रीकरणादरम्यान आलेल्या मोदींच्या लोकप्रियतेचाही किस्सा सांगितला. गांधीनगर येथे चित्रीकरण सुरू असतेवेळी जेव्हा मोदींच्याय रुपात आपण चाहत्यांसमोर आलो, तेव्हा खरेखुरे मोदी समोर आल्याप्रमाणेच उपस्थित चाहत्यांमघ्ये आनंद आणि उत्साहाची लाट पाहायला मिळाली. तर, काहींनी मोदींच्याच नावाच्या घोषणा देण्यात सुरुवात केली होती, ही आठवम विवेकने सांगितली. यावेळी चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वी तो बराच आशावादी असल्याचंही पाहायला मिळालं. 'पीएम नरेंद्र मोदी' या चित्रपटात विवेक ओबेरॉय पंतप्रधान नरेंद्र मोदींची भूमिका साकारत आहे. त्याची ही मध्यवर्ती भूमिका आणि चित्रपटाचा ट्रेलर गेल्या बऱ्याच दिवसांपासून चर्चेचा विषय ठरत होता. पण, निवडणुकांचा एकंदर माहोल पाहता विरोधी पक्ष नेत्यांकडून आचारसंहितेदरम्यान या चित्रपटाच्या प्रदर्शनाला तीव्र विरोध करण्यात आला होता. अखेर आता हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येण्यासाठी सज्ज आहे.

 

 

 

 

मागे

“गेम ऑफ थ्रोन्स”ने घेतला प्रेक्षकांचा निरोप
“गेम ऑफ थ्रोन्स”ने घेतला प्रेक्षकांचा निरोप

मनोरंजन विश्वात सध्याच्या घडीला एकंदर हवा पाहता गेम ऑफ थ्रोन्स या काल्पनिक....

अधिक वाचा

पुढे  

“आ राहा है दोबारा, अब कोई रोक नही सकता...”, “पीएम नरेंद्र मोदी” चित्रपटाचं नवं पोस्टर रिलीज
“आ राहा है दोबारा, अब कोई रोक नही सकता...”, “पीएम नरेंद्र मोदी” चित्रपटाचं नवं पोस्टर रिलीज

'आ राहा है दोबारा, अब कोई रोक नही सकता...' अशी टॅगलाईन असलेल्या 'पीएम नरेंद्....

Read more