ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

दीपिकाच्या मॅनेजरच्या घरी NCBची धाड; पाहा पुढे नेमकं काय झालं....

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: ऑक्टोबर 28, 2020 09:10 AM 2019-02-12T14:15:30+5:30

दीपिकाच्या मॅनेजरच्या घरी NCBची धाड; पाहा पुढे नेमकं काय झालं....

शहर : मुंबई

अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या मृत्यूप्रकराची चौकशी सुरु असतानाच या प्रकरणाला जोडून तपास सुरु असणाऱ्या ड्रग्ज प्रकरणाला पुन्हा एक नवं वळण मिळालं आहे. एनसीबीकडून सुरु असणाऱ्या तपासाअंतर्गत अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींचीही चौकशीही करण्यात आली. इतकंच नव्हे तर काहींना एनसीबीनं ताब्यातही घेतलं.

आता एनसीबीनं दीपिकाची मॅनेजर करिष्मा प्रकाश हिच्या घरी धाड टाकली, ज्यानंतर तिच्या घरातून ड्रग्ज जप्त केल्यानंतर तिला आता समन्सही बजावण्यात आलं आहे.

करिष्माच्या घरातून अंमली पदार्थ सापडल्यानंतर तिला समन्स पाठवण्यात आलं खरं. पण, त्यानंतर एनसीबी ncb तिला मात्र ट्रॅक करु शकली नाही. सूत्रांच्या माहितीनुसार 16/20 रिया केसमध्ये काही ड्रग्ज पेडलर्सच्या तपासणीमध्ये करिष्माचंही नाव समोर आलं होतं. ज्या आधारे एनसीबीनं तिच्या घरावर धाड टाकली.

मुख्य म्हणजे एनसीबीनं करिष्माचीही चौकशी केली होती. आता समोर आलेल्या माहितीनुसार करिष्माच्या घरातून जवळपास 1.8 ग्रॅम चरस जप्त करण्यात आला. मुख्य म्हणजे अनेक ड्रग्ज पेडलर्सकडून करिष्माचं नाव घेण्यात आलं होतं. ज्यानंतर तिच्यावर ही कारवाई करण्यात आली. आता करिष्माला समन्स बजावण्यात आल्यानंतर यापुढं एनसीबी कोणतं पाऊल उचलणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

 

मागे

ड्रग्स प्रकरणात अभिनेत्री प्रितीका चौहानला अटक, एनसीबीची कारवाई
ड्रग्स प्रकरणात अभिनेत्री प्रितीका चौहानला अटक, एनसीबीची कारवाई

ड्रग्स प्रकरणात अभिनेत्रींचा आता मोठा सहभाग पाहायला मिळत आहे. रिया चक्रवर्....

अधिक वाचा

पुढे  

'मराठी भाषिकांची मनापासून माफी मागतो', मनसे-शिवसेनेच्या दणक्यानंतर जान कुमार सानूची माफी
'मराठी भाषिकांची मनापासून माफी मागतो', मनसे-शिवसेनेच्या दणक्यानंतर जान कुमार सानूची माफी

‘कलर्स’ वाहिनीच्या ‘बिग बॉस’ (Bigg Boss 14) या रियालिटी शोमध्ये प्रसिद्ध गाय....

Read more