By DAYANAND MOHITE | प्रकाशित: ऑक्टोबर 27, 2020 10:53 AM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस ही कायमच तिच्या दिलखुलास अंदाजासाठी ओळखली जाते. जॅकलिनचं सभोवती असणं जणू काही सकारात्मकतेचा वाहता झरा, अशीच अनेकांची प्रतिक्रिया असते. अशी ही अभिनेत्री यशाच्या शिखरावर पोहोचलेली असतानाच तिच्यासाठी आणि तिच्यासोबत काम करणाऱ्यांनाही आपल्यासमवेत घेऊन चालत असते. याचा नुकताच प्रत्यय आला.
दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर तिनं आल्या स्टाफ मेंबरपैकी एकाला फक्त मिठाईचीच भेट न देता थेट एक कार भेट स्वरुपात दिली आहे. ही खऱ्या अर्थानं एक अविस्मरणीय भेट ठरत आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, हिंदी कलाविश्वात पदार्पण केल्या क्षणापासून जॅकलिनसोबत असणाऱ्या या स्टाफ मेंबरला तिनं ही भेट दिली आहे. कार भेट देणाऱ्या जॅकलिनला या भेटवस्तूची डिलिव्हरी केव्हा होणार हे मात्र ठाऊक नव्हतं. त्यामुळंच सध्या ती सोशल मीडियायवर व्हायरल होणाऱ्या व्हिडिओंमध्ये वाहतूक पोलिसांच्या गणवेशात दिसत आहे. कारण, कारची डिलिव्हरी झाली तेव्हा जॅकलिन ही तिच्या आगामी चित्रपटाच्या सेटवर होती.
स्टाफला अशी भेट देण्याची जॅकलिनची पहिलीच वेळ नाही. यापूर्वीसुद्धा तिनं आपल्या मेकअप आर्टीस्टलाही भेट स्वरुपात कार दिली होती. तेव्हा आपल्या या अंदाजानं जॅकलिन सुपरहिट ठरतेय असंच म्हणावं लागेल.
अभिनेत्री राधिका आपटे हिने 2012 मध्ये ब्रिटिश संगीतकार बेनेडिक्ट टेलरसोबत लग....
अधिक वाचा