By DAYANAND MOHITE | प्रकाशित: नोव्हेंबर 09, 2020 11:02 AM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
रिपब्लिक वाहिनीचे संपादक अर्णब गोस्वामी यांच्यावर काही दिवसांपूर्वीच अटकेची कारवाई करण्यात आली. ज्यानंतर सोशल मीडियापासून राजकीय वर्तुळामध्येही याबाबतची चर्चा, आरोप- प्रत्यारोपांची सत्र पाहायला मिळाली. याच वादाच आता अभिनेत्री kangana ranaut कंगना राणौत हिनंही उडी घेतली आहे.
सोशल मीडियावर बऱ्यापैकी सक्रीय असणाऱ्या कंगना राणौत हिनं पुन्हा एकदा असंकाही वक्तव्य केलं आहे, ज्यामुळं तिनं अनेकांचं लक्ष वेधलं आहे. आता कंगनानं ट्विटवर एक व्हिडिओ पोस्ट करत arnab goswami अर्णब गोस्वामी यांना मिळत असणाऱ्या वागणुकीबाबत काँग्रेवर निशाणा साधला आहे.
व्हिडिओ पोस्ट करत तिनं लिहिलं, 'अर्णब यांना बॉलिवूडमधील ड्रग माफिया, चाईल्ड ट्रॅफिकिंगबाबत गौप्यस्फोट करण्यासाठी आणि सोनियाजींना त्यांच्या खऱ्या नावानं संबोधण्यासाठीच हा त्रास देण्यात येत आहे'.
अन्वय नाईक यांच्या आत्महत्येपूर्वी त्यांनी लिहिलेल्या सुसाईड नोटबाबत लिहित त्यांनी नाईक यांचे थकित पैसे दिले आहेत की नाही हे न्यायालय ठरवेल असं कंगना म्हणाली.
Arnab ji is being tortured for exposing drug mafia and child trafficking business in Bullydawood and of course calling Sonia ji by her original name #ArnabGoswami pic.twitter.com/h5uYpgKmNo
— Kangana Ranaut (@KanganaTeam) November 8, 2020
वेळीच पैसे न दिल्यास कोणी आत्हमत्या करु शकेल का, हे न्यायालयच ठरवेल. बरं जर केलीसुद्धा तर, हा इतका मोठा गुन्हा आहे ज्यावर न्यायालयात खटला व्हावा, असा सवाल तिनं उपस्थित केला.अर्णब यांना नेमकी शिक्षा का होत आहे, हे सर्वच जाणतात असं म्हणत कारावासात त्यांचा छळ सुरु असल्याचं ते स्वत: म्हणत आहेत असंही ती म्हणाली.
अर्णब यांना जितका जास्त त्रास देण्यात येईल तितके ते आणखी धीट होतील. त्यांची प्रसिद्धी वाढेल आणि इतिहास पप्पू सेनेला संविधानाच्या चौथ्या स्तंभाला हीन वागणूक दिल्याबद्दल लक्षात ठेवेल. तर, अर्णब यांना एक हिरो म्हणूनच लक्षात ठेवेल, असं कंगना या व्हिडिओमध्ये म्हणाली.
अभिनेत्री तनुश्री दत्ताने नाना पाटेकर यांच्यावर 2018 मध्ये ‘Me Too’ चळवळींतर....
अधिक वाचा