ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

'संपूर्ण महाराष्ट्र ढासळतोय, पण सरकार माझ्याशी वाद घालण्यात मग्न'

By SHEETAL CHAVAN | प्रकाशित: सप्टेंबर 21, 2020 12:44 PM 2019-02-12T14:15:30+5:30

'संपूर्ण महाराष्ट्र ढासळतोय, पण सरकार माझ्याशी वाद घालण्यात मग्न'

शहर : मुंबई

काही दिवसांपूर्वीच महाराष्ट्र आणि मुंबईबाबत आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या अभिनेत्री कंगना राणौत kangana ranaut  हिनं पुन्हा एकदा राज्यातील सत्ताधारी सरकारवर निशाणा साधला. भिवंडीतील दुर्घटना प्रकरणाचा संदर्भ देत सध्याच्या घडीला राज्य शासनाच्या भूमिकेवर तिनं सडकून टीका केली आहे. 'संपूर्ण महाराष्ट्र ढासळतोय, पण महाविकासआघाडी सरकार माझ्याशी वाद घालण्यात मग्न', अशा शब्दांत तिनं पुन्हा एकदा टीकेचा सूर आळवला.

एका ट्विटमधून भिवंडी इमारत दुर्घटनेबाबत माहिती देत, 'सध्या दुर्दैव हे आहे की सध्या महाराष्ट्र शासनाकडे फक्त कंगनाच्या कार्यालयावर कारवाई करण्यापुरताच वेळ आहे', अशी प्रतिक्रिया देण्यात आली. या ट्विटचा संदर्भ घेत त्यावर उत्तर देण्यासाठी म्हणून बी- टाऊनची ही क्वीन पुन्हा मोठ्या आवेगात महाराष्ट्र शासनावर टीका करताना दिसली. 'दरम्यानच्या काळात महाराष्ट्र सरकारचं --- कंगनाच सुरु आहे. त्यांनी माझा नाद सोडला तर कुठं, साऱ्या राज्याचा डोलारा नेमका कसा कोलमडत आहे हे त्यांच्या लक्षात येईल', असं ट्विट तिनं केलं.

भिवंडीमध्ये सोमवारी पहाटेच्या सुमारास झालेल्या इमारत दुर्घटनेमध्ये आतापर्यंत अनेकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. मुख्य म्हणजे अतिधोकादायक म्हणून या इमारतीला नोटीस जाऊनही त्यापुढील कारवाई मात्र करण्यात आली नव्हती. त्यामुळं पुन्हा एकदा स्थानिक आणि राज्य प्रशासनाकडून अशा प्रकारच्या बांधकामांचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. हीच बाब हेरत आपल्याला होणाऱ्या विरोधाची किनार अधोरेखित करत कंगनानं सरकारवर थेट शब्दांत टीका केली.

 

मागे

अनुरागबद्दल बोलायला ६ वर्ष का लागली ? पायल घोष म्हणते...
अनुरागबद्दल बोलायला ६ वर्ष का लागली ? पायल घोष म्हणते...

अभिनेत्री पायल घोषने दिग्दर्शक अनुराग कश्यपवर लैंगिक शोषणाचा आरोप केलाय. य....

अधिक वाचा

पुढे  

'आता कंगना शेतकऱ्यांना आतंकवादी म्हणाली'; 'क्वीन' पुन्हा वादाच्या भोवऱ्यात
'आता कंगना शेतकऱ्यांना आतंकवादी म्हणाली'; 'क्वीन' पुन्हा वादाच्या भोवऱ्यात

गेल्या काही दिवसांपासून, किंबहुना ठामपणे आपल्या भूमिका सातत्यानं मांडत आल....

Read more