By DAYANAND MOHITE | प्रकाशित: जून 30, 2019 12:32 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
'दंगल' या चित्रपटामुळे प्रकाशझोतात आलेली अभिनेत्री झायरा वसिम हिने एकाएकी चित्रपट विश्वातून काढता पाय घेण्याचा निर्णय घेतला आहे. बालकलाकार म्हणून 'दंगल' चित्रपटातून तिने चित्रपट कारकिर्दीला सुरुवात केली होती. आमिर खानच्या मुलीची म्हणजेच कुस्तीपटू गीता फोगाट हिच्या बालपणीची भूमिका तिने अतिशय प्रपभावीपणे साकारली होती.
'दंगल'मुळे लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचल्यानंतर आमिरसोबतच ती 'सिक्रेट सुपरस्टार' या चित्रपटातूनही झळकली होती. पण, आता मात्र तिने एकाएकी चित्रपट विश्वातून काढता पाय घेण्याचा निर्णय घेतला त्यामुळे अनेकांनाच धक्का बसला आहे.
बॉलिवूड दबंग खान सलमान सध्या त्याच्या आगामी 'दबंग ३' चित्रपटाच्या शूटिंग....
अधिक वाचा