By MACHHINDRANATH PAWAR | प्रकाशित: मे 07, 2019 03:45 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
बॉलिवूडचे खिलाडी अक्षय कुमार पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. फानी चक्रीवादळामुळे उद्ध्वस्त झालेल्या ओडिशातील पीडितांना अक्षय कुमारनं एक कोटी रुपयांची मदत केली आहे. ’हिदुस्तान टाइम्स’नं दिलेल्या वृत्तानुसार, अक्षय कुमारनं ओडिशामध्ये आलेल्या फानी चक्रीवादळाचा फटका बसलेल्या नागरिकांसाठी मदतीचा हात पुढे केला आहे. त्यानं मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी 1 कोटी रुपयांची मदत केली आहे.
बॉलिवूडमधील विश्वसनीय सूत्रांकडून ’हिदुस्तान टाइम्स’ला ही माहिती मिळाली आहे. वृत्तपत्रानं याबाबत ओडिशातील मुख्यमंत्री कार्यालयाशी संपर्क साधून माहिती घेण्याचा प्रयत्न केला. मात्र अद्यापपर्यंत यावर कोणतेही उत्तर मिळालेले नाही. दरम्यान, अक्षय कुमारनं यापूर्वीही अशी अनेक सामाजिक कार्य केलेली आहेत. केरळ आणि चेन्नईमधील पूरग्रस्त पीडितांनाही आर्थिक मदत केली आहे. तेव्हादेखील अक्षयनं एक कोटी रुपयांची मदत केली होती. अक्षयनं पुलवामा हल्ल्यातील शहीद जवानांच्या कुटुंबीयांनाही मदतीचा हात दिला होता.
लोकसभा निवडणुकांचे वारे साऱ्या देशात वाहत असतानाच आता काही बॉलिवूड कलाकार....
अधिक वाचा