By DAYANAND MOHITE | प्रकाशित: जून 17, 2019 05:52 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
प्रसिद्ध चित्रपट निर्माते- दिग्दर्शक मणिरत्नम यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. चेन्नईतील अपोलो रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आलं आहे. कार्डिऍक अरेस्टमुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. मणिरत्नम यांना यापूर्वीही तीन वेळा रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. २००४ मध्ये त्यांना पहिल्यांदा हृदयविकाराचा झटका आला होता.
'युवा' या चित्रपटाच्या सेटवर त्यांची प्रकृती खालावली होती. त्यानंतर जवळपास दहा वर्षांनी, २०१५ मध्ये त्यांना दुसऱ्यांदा हृदयविकाराचा झटका आला होता. श्रीनगरमध्ये सुट्ट्यांचा आनंद घेतेवेळीच त्यांच्या प्रकृतीत बिघाड झाला होता. ज्यानंतर त्यांना दिल्लीमध्ये आणत उपचार प्रक्रिया सुरु करण्यात आली होती. त्यावेळी त्यांच्या प्रकृतीत झालेल्या या बिघाडाची माहिती माध्यमांपासून दूर ठेवण्यात आली होती.२०१८ मध्येही त्यांना तब्येत खालावल्यामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. पण, तेव्हा मात्र दैनंदिन तपासणीसाठी ते रुग्णालयात गेले होते, अशी माहिती समोर आली होती.
दरम्यान, सध्याच्या घडीला मणिरत्नम यांना चौथ्यांदा रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. लोकेश जय यांनी याविषयीचं ट्विट करत या बातमीला दुजोरा दिला. ते 'पोण्नियिन सेल्वन' या चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यग्र होते. ज्यामध्ये अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन हिसुद्धा झळकणार आहे. आता मात्र सर्वांच्या नजरा मणिरत्नम यांच्या प्रकृतीकडे लागल्या आहेत.
बॉलिवूडमध्ये असे काही चित्रपट आहेत ज्यांना प्रदर्शित होऊन अनेक काळ लोटला आ....
अधिक वाचा