By PRIYANKA BAGAL | प्रकाशित: एप्रिल 13, 2019 01:22 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
२०१८ मध्ये प्रदर्शित झालेला अंधाधून या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई केली होती. त्याच्या लोकप्रियतेनंतर तो चीनमध्ये पियानो प्लेअर नावानं प्रदर्शित झाला. गेल्या वर्षभरापासून चीनमध्ये भारतीय चित्रपटांना प्रेक्षकांची चांगली पसंती मिळत आहे. यापूर्वी चीनमध्ये केवळ आमिर खानच्या चित्रपटांचा मोठा प्रेक्षकवर्ग होता. मात्र आता बॉलिवूडधील अनेक चित्रपट चीनमध्ये सुपरडुपर हिट ठरत असल्याचं पाहायला मिळत आहे. अंधाधून,दंगल,सिक्रेट सुपरस्टार, बजरंगी भाईजान, हिंदी मीडियम, हिचकी यासारख्या चिञपटांनी चीनमध्येही तिकीटबारीवर तुफान कमाई केलीय.
बॉलिवूड अभिनेञी प्रियंका चोप्रा आणि निक जोनास त्यांच्या लग्नानंतर नेहमीच ....
अधिक वाचा