ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

बॉलिवूडचा भाईजान 'दबंग ३' ने तब्बल १५५ कोटी रुपये प्रदर्शनापूर्वीच आपल्या खिशात जमा केले...

By VISHRANTI SHINDE | प्रकाशित: डिसेंबर 09, 2019 07:46 PM 2019-02-12T14:15:30+5:30

बॉलिवूडचा भाईजान 'दबंग ३' ने तब्बल १५५ कोटी रुपये प्रदर्शनापूर्वीच आपल्या खिशात जमा केले...

शहर : मुंबई

बॉलिवूडचा भाईजान सलमान खान चा 'दबंग ३' हा २०१९ मधील सर्वात जास्त कमाई करणारा चित्रपट ठरेल शक्यता वर्तवली जात आहे. कारण प्रदर्शनापूर्वीच 'दबंग'ने आपली कमाई सुरु केली आहे. अमेझॉन प्राईमला ऑनलाईन स्ट्रीमिंग आणि टी-सीरिजला चित्रपटातील संगीताचे हक्क विकून 'दबंग'ने तब्बल १५५ कोटी रुपयांची कमाई केली आहे. अलिकडेच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला होता.


'दबंग ३' हा दबंग मालिकेतला अनुक्रमे तीसरा चित्रपट आहे. याआधी प्रदर्शित झालेल्या दोनही चित्रपटांनी बॉक्सऑफीसवर कोट्यवधी रुपयांची कमाई केली. सलमान खान आणि भाऊ अरबाज खानच्या मदतीने 'दबंग ३'ची निर्मिती केली आहे. त्यांनी ओटीटी प्लॅटफॉर्मचे हक्क अमेझॉन प्राइम व्हिडिओला ६० कोटी रुपयांचा विकले. त्याचवेळी त्यांनी ८० कोटी रुपयांना चित्रपटाचे सेटेलाईट हक्क झी नेटवर्कला विकले. शिवाय टी सीरिजने चित्रपटाचे संगीत हक्क १५ कोटी रुपयांमध्ये विकत घेतले आहेत. परिणामी प्रदर्शनापूर्वीच 'दबंग ३'ने तब्बल १५५ कोटी रुपये आपल्या खिशात जमा केले आहेत.


या आधीच्या चित्रपटामध्ये सोनाक्षी सिन्हा हीने मुख्य अभिनेत्रीची भूमिका साकारली होती. 'दबंग ३' मध्ये सोनाक्षीच मुख्य अभिनेत्रीच्या भूमिकेत दिसणार आहे. या शिवाय मराठी सुपरस्टार महेश मांजरेकर यांची मुलगी सई मांजरेकर ही देखील या चित्रपटामध्ये अभिनय करताना दिसेल. 'दबंग -३' हा चित्रपट फ्लॅशबॅक फॉरमॅटमध्ये तयार केला गेला आहे. यांत पोलिस अधिकारी होण्याच्या आधी चुलबुल कसा होता? हे कथानक दाखवले जाणार आहे.
 

मागे

पानिपत बॉक्सऑफिसवर लढाई करताना पिछाडीवर...
पानिपत बॉक्सऑफिसवर लढाई करताना पिछाडीवर...

आशुतोष गोवारीकर यांच्या बहुचर्चित 'पानीपत' या चित्रपटात अर्जुन कपूर आणि ....

अधिक वाचा

पुढे  

कपिल शर्मा झाला बाबा; घरी आली गोंडस परी...
कपिल शर्मा झाला बाबा; घरी आली गोंडस परी...

सगळ्यांना पोट धरून हसायला लावणाऱ्या प्रसिद्ध कॉमेडियन कपिल शर्माच्या घरी ....

Read more