By DAYANAND MOHITE | प्रकाशित: ऑगस्ट 23, 2020 08:54 AM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : ठाणे
सिनेअभिनेत्री सेजल शर्मा आत्महत्या प्रकरणी पोलिसांनी तिचा प्रियकर आदित्य वशिष्ठ याला अटक केली आहे (Boyfriend arrest in Actress Sejal Sharma Suicide Case). त्याला न्यायालयाने सोमवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. त्याच्यावर प्रेयसी सेजल शर्माला फसवल्याचा आणि आत्महत्येला प्रवृत्त केल्याचा आरोप आहे. आदित्य वशिष्ट दिल्लीतील एक जीम इंस्ट्रक्टर आणि मॉडेल आहे.
सेजल कृष्णकुमारी शर्मा (वय 26) मिरारोड पूर्वमधील रॉयल नेस्ट बिल्डिंगमध्ये राहत होती. तिने जानेवारीमध्ये घरात गळफास घेऊन आत्महत्या केली होती. यानंतर पोलिसांनी तिचा प्रियकर आदित्य वशिष्ठ (30) याला तपासासाठी बोलावलं होतं. मात्र त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. सेजल शर्माच्या आईने देखील पोलिसांकडे तक्रार केली होती. अखेर पोलिसांना त्याच्याकडून समाधानकारक उत्तरे न मिळाल्याने मिरारोड पोलिसांनी आदित्य वशिष्टला अटक केली.
न्यायालयात हजर केले असता आरोपी आदित्य वशिष्ट याला न्यायालयाने 4 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सेजल शर्माचा मृतदेह 24 जानेवारी रोजी तिच्या मिरा रोड येथील घरात गळफास घेतलेल्या स्थितीत आढळला होता. त्या दिवशी सेजलचं केवळ आदित्य वशिष्टशी बोलणं झालं होतं.या प्रकरणी सेजलच्या आईने दिलेल्या तक्रारीवरुन एप्रिलमध्ये तक्रार दाखल करण्यात आली. यात तिच्या आईने आदित्य वशिष्टने सेजलला तिच्या अडचणी सोडवण्याचं आश्वासन देऊन फसवल्याचा आरोप करण्यात आला आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आदित्यने सेजलसोबतचं नातं ज्या दिवशी तोडलं त्याच दिवशी सेजलने आत्महत्येचं पाऊल उचललं.
अभिनेता सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे देण्याचा नि....
अधिक वाचा