ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

ब्रिटिश अॅसिड अटॅक सर्वायव्हर केटी पायपरने केले 'छपाक' चे कौतुक, म्हणाली…

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: डिसेंबर 14, 2019 11:22 AM 2019-02-12T14:15:30+5:30

ब्रिटिश अॅसिड अटॅक सर्वायव्हर केटी पायपरने केले 'छपाक' चे कौतुक, म्हणाली…

शहर : मुंबई

अॅसिड अटॅक सर्वायव्हर मालतीच्या आयुष्यावर आधारित चित्रपट 'छपाक'चा ट्रेलर प्रत्येक ठिकाणी कौतुक मिळवत आहे. ब्रिटिश नागरिक आणि अॅसिड अटॅक सर्वायव्हर मॉडेल आणि टीव्ही प्रेझेंटर केटी पायपरनेदेखील ट्रेलरचे कौतुक केले आहे. तिने इंस्टाग्रामवर पोस्ट शेअर करून मेघना गुलजारचे क्रिएशनचेही खूप कौटू केले. टीव्ही अँकर आणि मॉडेल असलेल्या केटीवर तिच्या एक्स बॉयफ्रेंडने अॅसिड फेकले होते, ज्यामुळे तिचा चेहरा पूर्णपणे खराब झाला होता.

मार्च 2008 मध्ये एक्स बॉयफ्रेंड डॅनियल लिंचच्या अॅसिड अटॅकची शिकार झालेल्या केटी पायपरने 'छपाक' चा ट्रेलर शेअर केला आहे. आपल्या अधिकृत इंस्टाग्राम हॅण्डलवरून तिने चित्रपटाचे कौतुक केले आहे. केटीच्या या प्रतिक्रियेवर दीपिकानेदेखील तिला धन्यवाद म्हणाले. अभिनेत्रीने लिहिले की, 'या शाउट आउटसाठी तुमचे आभार, लवकरच तुम्हाला भेटेन.'

केटीने लिहीले की, केटीने लिहिले की, या चित्रपटाचा ट्रेलर पाहून माझा श्वास थांबला. यामध्ये गुंग होण्यासाठी मला हा चित्रपट तीन ते चार वेळा पाहावा लागेल. तिने लिहिले या चित्रपटातील मालतीचे न्यायालयीन युद्ध आणि यादररम्यान वेदना बोलून दाखवते. चित्रपटात कळते की, कसे अॅसिड अटॅकला कोणत्या नजरेने पहिले जाते. मालतीला चेहरा भलेही बिघडला असेल. पण इरादा आजही कणखर आहे. ही एक वेदना आणि विजयाची एक ना ऐकलेली कथा आहे.

काय होते केटी पायपरचे प्रकरण...

फेब्रुवारी 2008 मध्ये केटी आणि डॅनियल यांच्या प्रेमाची सुरुवात फेसबुकवर झाली. दोघांच्या नात्याला काहीच आठवडे झाले होते आणि त्यानंतर त्यांच्यामध्ये संशय निर्माण होऊ लागला आणि यामुळे लिंचने मॉडेलवर अॅसिड फेकून दिले. घटनेनंतर पीडितेला हॉस्पिटलला घेऊन गेले. जिथे ती सुमारे 12 दिवसांपर्यंत ती कोमामध्ये राहिली. मात्र नंतर अॅसिड फेकणारे सिलवेस्टर आणि लिंच पोलिसांच्या हाती सापडले.

रंगोली चंदेलनेही केले चित्रपटाचे कौतुक...

केटीपूर्वी कंगना रनोटची बहीण रंगोली चंदेलनेही दीपिका पदुकोणचा चित्रपट 'छपाक' च्या ट्रेलरचे कौतुक केले आहे. तिने मेघना गुलजार आणि दीपिकाचे कौतुक करत चित्रपट यशस्वी होण्यासाठी शुभेच्छा दिल्या. रंगोलीनेदेखील अॅसिड अटॅकच्या वेदना सहन केल्या आहेत. तिच्यावर एका मुलाने प्रपोजल ठोकारल्याच्या रागात अॅसिडचा हल्ला केला होता, ज्यामुळे तिचा उजवा कान आणि चेहरा खराब झाला होता. यानंतर रंगोलीला सुमारे 54 सर्जरींचा सामना करावा लागला होता.

मागे

अर्जुन कपूरकडून गृहिणींना मिळणार नवीन वर्षाचे अनोखे गिफ्ट, तुम्हीच पहा...
अर्जुन कपूरकडून गृहिणींना मिळणार नवीन वर्षाचे अनोखे गिफ्ट, तुम्हीच पहा...

                अर्जुन कपूर आपल्या अभिनयाच्या जोरावर चांगलाच प्रसिद्....

अधिक वाचा

पुढे  

'मर्दानी २' प्रदर्शित होताच पहिल्या दिवशी ३.८० कोटींची कमाई
'मर्दानी २' प्रदर्शित होताच पहिल्या दिवशी ३.८० कोटींची कमाई

मुंबई - अभिनेत्री राणी मुखर्जी चा 'मर्दानी २' चित्रपट १३ डिसेंबर रोजी रूपे....

Read more