By VISHRANTI SHINDE | प्रकाशित: डिसेंबर 17, 2019 05:59 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : देश
मुंबई - १४ वर्षांनंतर बंटी और बबली चाहत्यांच्या भेटीस येणार आहे. 'बंटी और बबली' चित्रपटाच्या पहिल्या भागात अभिनेता अभिषेक बच्चन बंटीच्या भूमिकेत तर अभिनेत्री राणी मुखर्जी बबलीच्या भूमिकेत झळकली होती. आता 'गली बॉय' फेम अभिनेता सिद्धार्थ चतुर्वेदी लवरकच 'बंटी और बबली' चित्रपटाच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. यशराज फिल्म्सने या संबंधतीत अधिकृत घोषणा केली.
दुसऱ्या भागात अभिनेता सिद्धार्थ आणि अभिनेत्री शर्वरी मुख्य भूमिकेत झळकणार आहेत. मुख्य म्हणजे यशराज फिल्मच्या माध्यमातून शर्वरी रूपेरी पडद्यावर पदार्पण करणार आहे. सांगायचं झालं तर यशराज फिल्म्सने अनेक नवख्या कलाकारांना अभिनयाची संधी दिली आहे.
त्यापैंकी एक म्हणजे वरूण शर्मा. वरूनने अनेक हिट चित्रपटांमध्ये सहायक दिग्दर्शकाचं काम केलं आहे. तो आता 'बंटी और बबली २' चित्रपटाचं देखील दिग्दर्शन करणार आहे. 'सुलतान', 'टायगर जिंदा है' या चित्रपटांमध्ये त्याने सहायक दिग्दर्शकाचं काम केलं होतं.
खुद्द यशराज फिल्म्सच्या टीमने इन्स्टाग्रामच्या माध्यमातून चित्रपटाची घोषणा केली आहे. शिवाय नवीन बंटी आणि बबलीचा फोटो पोस्ट केला आहे. आता हे नवीन बंटी बबली चाहत्यांचे किती मनोरंजन करतील हे प्रेक्षकांना पाहणं महत्त्वाचं ठरेल.
दिग्दर्शक "रोहित शेट्टी" यांनी 'सूर्यवंशी' या चित्र....
अधिक वाचा