By DAYANAND MOHITE | प्रकाशित: एप्रिल 08, 2019 11:44 AM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
लोकसभा निवडणुकाच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्ष जोरदार प्रचार करत आहेत. एकुण सात टप्प्यात मतदान होणार आहे. त्यासाठी अनेक सामाजिक संस्था वेगवेगळ्या योजना राबवताना दिसत आहेत. मतदरांना मतदानाचा हक्क बजावण्यास आवाहने केली जात आहेत. काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जनतेला मतदान करण्याचे आवाहन केले होते. त्याचप्रमाणे सेलेब्रिटीही मतदारांना आवाहन करताना दिसत आहेत. सोशल मीडियाच्या माध्यमतून हे कलाकार आपले मत मांडत आहेत. तर अभिनेत्री रेणुका शहाणेने निवडणुकीत सतर्कता बाळगत मतदान करण्याचे आवाहन मतदारांना केले आहे.
निवडणुकींचे वारे वाहताना दिसत आहेत. राजकीय वातावरण तापले आहे. रेणुकाने ट्विटवर एक पोस्ट केले आहे. ती म्हणाली, 'निवडणुकीच्या काळात विविध पक्षांचे उमेवार अचानक 'आम' होतात. सामान्य जनतेप्रमाणे बस, ट्रेन, रिक्षाने प्रवास करतात एवढेच नाही तर ते गरिबांच्या घरी जाऊन जेवतात आणि शेतात शेती करताना दिसतात. जनतेने त्यांचे मागील ५ वर्षाच्या काम पाहून विचारपूर्वक मतदान करायला हवा.'
सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या रेणुकाच्या अनेकांनी चांगली प्रतिक्रिया केली. दुसरीकडे अनेक नेयकऱ्यांनी तिला ट्रोल केले. नेटकऱ्यांच्या अनेक प्रश्नांचे समर्थन रेणुकाने केले. रेणुका नेहमीच अनेक मुद्द्यांवर तिचे परखड मत मांडते. नुकताच सुचित्रा कृष्णमूर्ति यांनी केलेल्या ट्विटवर रेणुकाने देहविक्रीचा व्यवसाय करणाऱ्या महिलांचे समर्थन केले होते.
पीएम नरेंद्र मोदी' चित्रपटात खुद्द मोदींची भूमिका साकारणाऱ्या अभिनेता वि....
अधिक वाचा